- गजानन मोहोडअमरावती - संत्र्याच्या आंबिया बहराची सध्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. करोडोचा संत्रा मातीमोल होत असल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर डाॅ. पं. दे. कृ. विद्यापीठामध्ये आढावाही घेण्यात आला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाचा सल्ला पोहोचलाच नसल्याने व्यवस्थापन कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिम विदर्भात संत्राचे उत्पादनक्षम ८८७५२ हेक्टर क्षेत्र आहे व त्याद्वारे ८.५ लाख मे. टन संत्राचे उत्पादन होते. यामध्ये सर्वाधिक वाटा अमरावती जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात ७८ हजार क्षेत्र व ७७६०० मे. टन उत्पादन होत आहे. सद्य:स्थितीत संत्र्याच्या आंबिया बहराची फळे परिपक्त होत असताना अचानक गळती सुरू झाल्याने झाडांखाली संत्र्याचा खच पडला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे.