अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या राज्य अंतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी अद्याप सुरू झालेले नाही. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी अद्यापही प्रवाशांचा महामंडळाच्या रातराणीला बसना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अमरावतीतून परराज्यात जाणाऱ्या हैद्राबाद, भोपाळ, खंडवा व अन्य सर्वच रातराणी बस सध्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बस गाड्या बदलत प्रवास करावा लागत आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने ७ जून पासून सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात अनलॉकमधील काही निर्बध वगळता सर्व प्रकारच्या बाजारपेठ व उद्योग व्यवसाय आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याची गर्दी वाढली आहे. मात्र, एसटीची परराज्यात जाणारी रातराणी अद्याप बंदच आहे.
बॉक्स
परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंदच
जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ८ आगार आहेत. त्यात अमरावती, बडनेरा, दर्यापूर, वरूड, परतवाडा, चांदुर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांचा समावेश आहे. यापैकी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून तेलगंणातील हैद्राबाद,मध्यप्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, पांढुर्णा, मुलताई आदी बस परराज्यात दिवसा व रातराणी बस सुरू होत्या. आता गेल्या दीड वर्षापासून ही परराज्यात एसटी बस बंद ठेवण्याचे आदेश तेथील प्रशासनाकडून दिले आहेत. त्यामुळे या बस बंद आहेत.
कोट
अमरावती आगारातून केवळ हैदराबाद ही परराज्यात जाणारी बस होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बस बंद करण्यात आली आहे. राज्य अंतर्गत मात्र नागपूर यवतमाळ अकोला या ठिकाणच्या रात्रंदिवस सुरू आहेत. परंतु त्या सुद्धा परिस्थिती पाहून सोडावी लागते. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या आर्थिक नुकसान होत आहेत.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक
बॉक्स
सीमेवरील गावापर्यंतच्या प्रवासही अडचणीचा
कोट
जिल्ह्यात परराज्यात जाणारी एकही रातराणी किंवा इतर बस सुरू नाहीत. पूर्वी अमरावती अन्य आगारातून मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी बस सुरू होती. आता ही बस बंद असून या मार्गावर सीमेपर्यंतचा प्रवाससुद्धा बस गाड्या बद्दल करावा लागतो. किमान परराज्यासाठी एक तरी बस जिल्ह्यातून सुरू करावी.
चंद्रभान घोंगडे, प्रवासी
कोट
जिल्ह्यातून भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर आदी ठिकाणी एसटी बसेस यापूर्वी जात होत्या. मात्र, कोरोनापासून या सर्व एसटी बसेस बंद असल्यामुळे मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी इतर वाहने बदलावीत गाव शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे या बस सुरू होणे गरजेचे आहे.
- दिलीप मिश्रा, प्रवासी