अनेक ठिकाणी बंदिस्त : वन्यजीव कायद्याचे उल्लंघनवैभव बाबरेकर अमरावतीवनजीव कायद्यानुसार पोपट किंवा अन्य कोणताही पक्षी बंदिस्त करून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, शहरातील बहुतांश घरात आजही पोपटांना पिंजऱ्यात कैद केल्याचे दिसून येते. त्यामुळे परंपरागत चालणारी पोपटांची कैदेची मालिका कधी संपणार, असा सवाल वन्यप्रेमी उपस्थित करीत आहेत. ृवनकायद्याची सर्रास पायमल्ली होत असताना वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. पोपट हा पाळीव पक्षी आहे. मनुष्याचे अनुकरण करून तसेच शब्दोच्चार करणे, हे पोपटाचे वैशिष्ट्य. त्यामुळे घरोघरी पोपटाला पिंजऱ्यात कैद करून पाळण्यावर भर दिला जातो. मात्र, पोपट हा वन्यजीव अधिनियमात मोडणारा पक्षी आहे. पोपटाला बंदिस्त करून ठेवणे हे वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन ठरते. हा बोलका वन्यजीव अधिक काळ एकाच घरात असल्यास तो घरातील मंडळींना नावाने हाक मारतो. त्यामुळे तो सर्वांच्याच आवडीचा पक्षी बनला आहे. मात्र, त्याला शोभेची वस्तू म्हणून कैद करून ठेवणे हा अपराध ठरतो. ही बाब वनविभागाला माहीत असतानाही कोणतीच कारवाई केली गेली नाही. आणखी किती दिवस पोपटांना बंदिस्त राहून जीवन जगावे लागेल, असा प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोपटांचीही तस्करी पोपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी केली जात असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील काही शिकारी पोपटांची घरटी शोधून त्यांची पिल्ले गोळा करतात आणि पालनपोषण करून त्यांची विक्री करतात. ‘लव्हबर्ड’सारख्या पक्ष्यांच्या आड पोपटांचीही विक्री जिल्ह्यात होत असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे या तस्करांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींची आहे. काय म्हणतो वन्यजीव अधिनियम ?भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची १ व २ मध्ये येणारा पोपट हा पक्षी अनेक घरांमध्ये पिजऱ्यांत बंदावस्थेत आढळून येतो. वास्तविक पोपटला कैद करून ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास पोपट पालकाला ३ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षासुद्धा होऊ शकते. मात्र, तरीसुद्धा बहुतांश परिसरातील घरांमध्ये पोपट पिजऱ्यांत बंदिस्त असल्याचे आढळून येतात. मात्र, आजपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. याकडे वनविभागाचे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे, हे विशेष. वनविभाग, वन्यप्रेमींनी एकत्र येऊन पोपटांना स्वतंत्र केले पाहिजेत. किती पोपट बंदिस्त आहेत, हे तपासून पहावे, जे नागरिक बंदिस्त पोपटांना सोडण्यास इच्छूक नसेल, अशांवर वनविभागाने कारवाई करावी. - यादव तरटे, पक्षी अभ्यासक पोपटाला बंदिस्त ठेवणे हा वन्यजीव कायद्यात गुन्हा आहे. यासंदर्भात जनजागृती करून नागरिकांना समजाविणे गरजेचे आहे. वनविभागाकडून कॅम्प घेऊन पोपटांना स्वातंत्र्य देण्याचे प्रयत्न करेल. - हेमंत मिना, उपवनसरंक्षक
कैदेतील पोपट कधी घेणार भरारी?
By admin | Published: August 13, 2016 12:09 AM