लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरातील मुख्य मार्गावरील आणि चंद्रलोक मार्केटसमोर रस्त्यावर अवैधरीत्या बांधण्यात आलेली दोन मजली इमारत बांधकामाला नगरपंचायतीने स्थगिती देऊन तोडण्याचे आदेश पारित केले होते. हे आदेश पारित होऊन महिना लोटत आले असतानासुद्धा या अवैध बांधकामाला तोडण्याचा मुहूर्त नगरपंचायतला सापडत नसल्यामुळे कुठेतरी पाणी मुरतेय, अशी शंका घ्यायला जागा मिळत आहे.शहरातील अमरावती - बुऱ्हाणपूर मुख्यमार्गावर चंद्रलोक मार्केटसमोरील दक्षिण बाजूला सीट क्रमांक ७ प्लॉट क्रमांक ६०८ आणि ६०९ च्या दरम्यान रस्त्यावर हाजी मोहम्मद युनूस हाजी शेख कादर या इसमाने गेल्या दोन महिन्या दरम्यान नगरपंचायतीचे स्थगन आदेशाचे उल्लंघन करीत तळमजला व पहिल्या माळावरील स्लॅबचे काम एका नगरसेवकाच्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. याबाबत तक्रारी मिळाल्यानंतर मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांनी १८ सप्टेंबर रोजी ते बांधकाम अवैध ठरवून तात्काळ काम बंद करण्याचे तसेच तोडून जागा मोकळी करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास स्वत: नगरपंचायत धजावत नसल्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर शंका निर्माण केल्या जात आहे. ते अवैध बांधकाम त्वरित काढण्यात यावे, यासाठी नगरपंचायतीच्या विरोधीपक्षनेत्या क्षमाताई चौकसे यांनी तीन दिवसांपूर्वी झालेल्या मासिक सभेत हा मुद्दा रेटून ठेवला होता. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. इतकेच नव्हे तर तो एकमात्र पाठीराखा नगरसेवक गावात फिरून त्या बांधकामाला हात लावून दाखवा, अशी भाषा वापरत असताना नगरपंचायत त्याच्यासमोर नांगी का टाकत आहे, यावर चर्चेला उधाण आले आहे.मुख्याधिकारी अनिच्छुकमुख्याधिकारी स्वत: ते अवैध बांधकाम तोडण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सदस्यांना योग्यप्रकारे प्रत्युत्तर दिले जात नाही, अशी भावना अनेक नगरसेवकांनी 'लोकमत'कडे व्यक्त केली आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणारे मुख्य मार्गावरील रस्त्यावर झालेले बांधकाम तोडण्यास जर नगरपंचायत इच्छुक नसेल तर इतरत्र अतिक्रमणाची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे अतिक्रमण वाढत आहे.
‘ते’ अवैध बांधकाम केव्हा तोडणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 5:00 AM
शहरातील अमरावती - बुऱ्हाणपूर मुख्यमार्गावर चंद्रलोक मार्केटसमोरील दक्षिण बाजूला सीट क्रमांक ७ प्लॉट क्रमांक ६०८ आणि ६०९ च्या दरम्यान रस्त्यावर हाजी मोहम्मद युनूस हाजी शेख कादर या इसमाने गेल्या दोन महिन्या दरम्यान नगरपंचायतीचे स्थगन आदेशाचे उल्लंघन करीत तळमजला व पहिल्या माळावरील स्लॅबचे काम एका नगरसेवकाच्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले.
ठळक मुद्देनगरपंचायत ढिम्म : एका नगरसेवकापुढे प्रशासन हतबल