शहरवासीयांचा सवाल : रिंग रोड फक्त कागदावरचसुमित हरकुट चांदूरबाजारशहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक बघता रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ ही नित्याचीच बाब झालेली आहे. त्यामुळे विस्कळीत वाहतुकीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतुकीची कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित होत आहे. दररोज होत असलेली लोकसंख्या वाढ. त्यामुळे दुचाकी, चारचाकीची वाढत असलेली खरेदी त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मात्र वाढलेली आहे. गुदमरल्यासारखी होत आहे. ग्रामीण भागातून दररोज ७००० विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता शहरात येतात. यातच ग्रामीण भागात शिकविणारे शिक्षक, कर्मचारी अधिकारी हे फक्त कागदावरच कार्र्यालयीन मुक्कामी राहत असल्याचे दाखवितात. प्रत्यक्षात मात्र ते ये-जा करतात. तसेच आंध्रप्रदेश, तामीळनाडू येथून दररोज १०० ते १२५ ट्रक शहरात ये-जा करतात. तेसुध्दा मोठ्या प्रमाणात वाहतुकीत भर टाकतात. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नेहमीचीत झाली आहे. शहराला बायपास व्हावा याकरिता गेल्या १२-१५ वर्षांपासून फक्त सर्व्हेच सुरू आहे. हा सर्व्हे जवळजवळ ४-५ वेळा झाला. मात्र हा बायपास कोठून कुठपर्यंत तयार होणार व कधी तयार होणार याची स्पष्ट माहिती अद्याप कोणालाही नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागणे नित्याचे झाले असले तरीही शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वाहतूक पोलीस कधीच कर्तव्यावर आढळून येत नाहीत. स्थानिक वाहतूक पोलीस केवळ येथील व्यापारींना त्याच्या दुकानासमोर वाहणे उभे न करू देण्यासाठीच नेमलेले असल्याचे दिसते. तसेच हे वाहतूक पोलीस मोर्शी मार्गावरील लाणोरी फाट्यावर व परतवाडा मार्गावरील ब्राह्मणवाडा थडी टी पॉर्इंटवरच सर्वाधिक काळ दिसतात. शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत चालली आहे. शहरातील वाहतूक वाढली आहे. अशातच शहराला बायपास हा अत्यंत आवश्यक पर्याय असल्याची शहरवासीयांची मागणी असून १२ वर्षांपासून केवळ कागदावरच असलेला बायपासचा शुभमुहूर्त कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघात हेसुध्दा नेहमीच होत असतात. यामध्ये जयस्तंभ चौकावर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला. काहींचा थोडक्यात जीव बचावला. हे सर्व प्रकार होत असताना शहरातून होणारी जड वाहतूक बायपासमार्गे बाहेरूनच होऊ शकते. त्यामुळे शहरातील ५० टक्के अपघाताचे धोके टळणार, हे मात्र निश्चित.
वाहतुकीची कोंडी कधी सुटणार ?
By admin | Published: December 28, 2015 12:18 AM