शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

कासवांना कधी मिळणार संरक्षण?

By admin | Published: March 05, 2016 12:27 AM

या आधुनिक युगात झटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाला एका फीशपॉट मध्ये बंदिस्त करून स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत.

लक्ष्मीदर्शनाचा मोह : झटपट श्रीमंत होण्याची अजब धडपडमोहन राऊत धामणगाव रेल्वेया आधुनिक युगात झटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाला एका फीशपॉट मध्ये बंदिस्त करून स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. विदर्भातील अनेक श्रीमंताच्या घरी जिवंत कासवांचा जीव घुसमटत असून वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे़ कमी वेळात अधिक समृध्दी देण्याचे काम कासव करीत असल्याची आख्यायिका आहे़ पाच हजार वर्षांपूर्वीचा कासवाचा इतिहास आहे़ प्रत्येकाच्या जीवनात सुख समृध्दी, संपत्ती कमी वेळात मिळावी म्हणून पगारदारांच्याही घरात कासव पाळले जात आहे़ अनेकांकडे फीशपॉटमध्ये दोन मासे असले तरी एक कासवाचे पिल्लू पहायला मिळते़ यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कासव हा सुखसमृध्दी मिळण्याचे प्रतीक मानले जाते़ कासवाला दीर्घायुष्य असते़ या मुक्या प्राण्याला मागील अनेक वर्षांपासून बंदिस्त करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे़ घरातील वास्तुदोष तसेच शत्रूपासून स्वत:चे रक्षण करणे, रोग व अनेक व्याधीपासून दूर राहण्यासाठी कासवाची मोठ्या किमतीत खरेदी करून त्याला बंदिस्त करण्याचे प्रकार आजघडीला विदर्भात मोठ्या प्रमाणात वाढील लागल्याचे दिसून येत आहे़ पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत किंमत कोणते ही प्रयत्न न करता एका महिन्यात आपण श्रीमंत व्हावे घरात सुख समृध्दी नांदावी, आपल्या घराला कोणाचीही दृष्टी लागू नये, यासाठी आजच्या या आधुनिक युगात अंधश्रध्देचा पगडा कायम आहे़ अमरावती विभागातीलच नव्हे, तर विदर्भातील मोठ्या नदीमध्ये कासवाचे पिल्लु पकडण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे़ मागील महिन्यात एका कासवाच्या पिलाची किंमत ५० हजार रूपये लागल्याची माहिती आहे़ जो कासव अती शुभ ठरविला जातो़ त्या कासवाला विदर्भातून मुंबईसारख्या शहरात पाच लाखांच्यावर वर मागणी असल्याने अनेकजण कासव पकडण्यासाठी विहिरी व नदीत दिवसाला अधिक मेहनत करीत आहेत़ नेत्यांच्या घरात दिसतेय कासवकासव हा वन्यजीवप्राणी असला तरी अनेक राजकीय नेत्यांच्या घरी फीशपॉटमध्ये कासव हा शोभेची वस्तू म्हणून दिसत आहे़ घरात सुख समृध्दी लाभावी, आपण आगामी निवडणुकीत सर्वाधिक मताने विजयी होण्यासाठी विदर्भातील अनेक नेत्यांनी या कासवाला बंदिस्त करून ठेवले आहे़ या नेत्यांच्या घरात शोभेची वस्तू म्हणून हा जिवंत कासव पहायला मिळत आहे़ सद्गुणांचे प्रतीक कासवकासव हा जीव सद्गुणांचा प्रतीक आहे़ यामुळे ज्ञानही प्राप्त होते़ शरणागती हा भाव कासवात आहे़ प्रत्येक मंदिरात कासवाची प्रतिकृती पाहायला मिळते. या कासवाचे दर्शन प्रत्येकजण घेतात. मंदिरात कासवाचे पूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असते़ या सद्गुणामुळे या प्रतिकृतीचे दर्शन घेत असल्याचे दिसते़कासव हा वन्यप्राणी असून त्याला घरात जिवंत ठेवणे, बंदिस्त करणे हा गुन्हा आहे़ वन्यसंरक्षण कायदा १९७२ अन्वये कलम ९ नुसार संंंंंंबंधितांवर कारवाई होऊ शकते़ नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे महत्त्वाचे आहे़ सुखसमृध्दीसाठी कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे़- अनंत गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वेवनविभागाचे अक्षम्य दुर्लक्षएखाद्या मुक्या प्राण्याला बंदिस्त करून एका ठिकाणी ठेवणे हा वनविभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा आहे़ परंतु वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या कासवाला अनेकांनी एका फीशपॉटमध्ये ठेवले असताना वनविभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर यावर कारवाई करण्याची प्रतीक्षा वनविभाग पाहत असल्याचे दारूण चित्र वनविभागात दिसत आहे़