संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने १८ कोटी ४७ लाखांचा गाडगेबाबा समाधी मंदिर विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. पण, अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत ही फाइल मंत्र्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरखड्याला अंतिम मंजुरी दिल्यास गाडगेबाबांच्या समाधी मंदिराचा विकास शक्य होणार आहे.गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिर हे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र आहे. या समाधी मंदिरासमोरील खुल्या चार एकराच्या जागेत अपूर्ण राहिलेले गाडगेबाबांच्या स्मृती मंदिराचे बांधकाम, स्मृती भवन, भक्तनिवास बांधकाम यांच्यासह येथील बगीचा, रस्ते असे विकसित करण्यात येणार आहे. या आराखड्याच्या अंतिम मंजुरीसाठी चार महिने ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या पायºया झिजवावा लागत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व नातेवाइकांना येथे सोय उपलब्ध होईल अशी दोन मजली धर्मशाळा पर्यटन विकास निधीतून आकारास येणार आहे.कर्मयोगी गाडगेबाबांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी आयुष्य झिजविले. त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. हे कार्य पुढे असेच चालू राहावे, याकरिता समाधी मंदिर ट्रस्टने विकास आराखडा शासनाला सादर केला. या आराखड्यासाठी चार एकर जागासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कधी फाइल नगरविकास खात्याकडून नियोजन विभागाकडे जाते, तर कधी नियोजन विभागाकडून नगरविकास विभागाकडे वर्ग केली जाते. यामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अंतीम मान्यतेचा प्रश्न मार्गी लावावा व निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी ट्रस्टचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी केली आहे.गाडगेबाबा समाधी मंदिर विकास आरखड्याचा प्रश्न जर मार्गी लागला, तर अमरावती शहरात ग्रामीण भागातून येणाºया गोरगरीब लोकांनी रात्री वा कठीण प्रसंगी निवासाची सोय होईल.स्मृती भवनात विविध साहित्य व पुस्तकांचा व आठवणींचा ठेवा या ठिकाणी ठेवता येणार आहे. त्याकारणाने गाडगेबाबा समाधी मंदिर विकास आरखड्याला अंतिम मान्यता देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाविकांनी व विश्वसतांनी केली आहे.स्मृती भवनाचे बांधकाम अर्धवटसमाधी मंदिर विकास आरखडा तयार करण्यापूर्वी स्मृती भवनाचे बांधकाम करण्याचे ठरले होते. माजी मंत्री वसुधा देशमुख व तत्कालीन आमदार सुनील देशमुख यांच्या प्रयत्नांतून या कामासाठी १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मिळाला. पण, या कामासाठी आणखी निधी आवश्यक असल्याने सदर काम आता अर्धवट पडले आहे. हे कामसुद्धा विकास आरखड्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे.पर्यटनमंत्र्यांनी केले साडेतीन कोटी मंजूरदोनमजली धर्मशाळेची इमारत बांधण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच याचे भूमिपूजन होणार असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी सांगितले.१८ कोटींचा समाधी मंदिर विकास आरखडा शासनाकडे प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी याला अंतिम मान्यता दिली, तर विकासाला गती मिळेल. त्यासाठी आम्ही चार महिन्यापासून प्रयत्न करीत आहोत.- बापूसाहेब देशमुखविश्वस्त, संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टया विकास आरखड्याची सद्यस्थिती मला ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी कळविली नाही. जर त्यांनी कळविले असते, तर पाठपुरावा केला असता. स्मृती भवनाच्या अधर्वट कामांसाठी फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात प्रस्ताव टाकण्यात येतील.- सुनील देशमुखआमदार, अमरावती.
समाधीसाठीचे १८ कोटी मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:50 PM
संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने १८ कोटी ४७ लाखांचा गाडगेबाबा समाधी मंदिर विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली.
ठळक मुद्देनेते घेणार का तसदी? : संत गाडगेबाबांच्या समाधी मंदिराचा विकास आरखडाचार महिन्यांपासून फाईल मंत्रालयात अंतिम मंजुरीची प्रतीक्षा