वरूड : रस्ता रुंदीकरणात १५ हजार वृक्षांचा बळी जात असताना वृक्ष लागवड करताना फोटो काढणारे व ते प्रसिद्धीसाठी देणारे सामाजिक कार्यकर्ते कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत. दुसरीकडे वृक्षांचा बळी जात असताना कुणालाच काही वाटत नाही काय असेही विचारले जात आहे.पांढुर्णा व नागपूर महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी ५० ते १०० वर्षांची वृक्ष कटाई केली जात आहे. यामुळे रस्ते ओस पडणार आहेत, यात शंकाच नाही. मात्र दुसरीकडे रस्त्यांच्या कडेला झाड लावण्यासाठी शासनाने शाळकरी विद्यार्थ्यांपासून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, प्रमुख, संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांना अवाहन केले होते. यावर कोट्यवधींचा खर्च केला होता. वृक्ष लागवड केल्यावर नेत्यांनी व सामाजिक संघटनांनी आपली प्रसिद्धीही केली होती.आता सर्रास वृक्षतोड होत असताना त्यांचे डोळे झाकले आहेत का, अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे.दुसरीकडे पर्यावरणाचा ºहास होण्यास कारणीभूत ठरणाºया अधिकाºयांवरच कारवाई करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे, तर पुढल्या वर्षी तरी लोकांना वृक्ष लागवडीबाबत जागृती करून नाहक वेळ वाया घालवू नये, असेही बोलले जात आहे.
कुठे गेल्या सामाजिक संघटना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 9:34 PM
रस्ता रुंदीकरणात १५ हजार वृक्षांचा बळी जात असताना वृक्ष लागवड करताना फोटो काढणारे व ते प्रसिद्धीसाठी देणारे सामाजिक कार्यकर्ते कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत.
ठळक मुद्देनागरिकांचा प्रश्न : हजारो वृक्षांचा रस्ता रुंदीकरणात बळी