लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : उष्ण व शुष्क वातावरणात जोरदार उन्हाळी वारे वाहायला सुरुवात होतात. या जोरदार वाºयाचा एक भाग म्हणजेच वावटळ. परतवाड्याच्या आठवडी बाजार परिसरात शनिवारी जोरदार वावटळ आली. परिसरातील केरकचºयासह गोल-गोल फिरत असताना अचानक भटकी कुत्रीही गोल-गोल फिरायला लागली. हा प्रकार काही क्षणापुरता नागरिकांनाही आश्चर्यचकित करून गेला.अंग शेकणारे उन्ह आणि त्यात उष्ण वारे ही उन्हाळ्याची ओळख असली तरी विदर्भात सर्वत्र तापमानाची लाट उसळली आहे. उष्णतेची लाट आली की, जोरदार वारेदेखील वाहायला सुरुवात होते. उत्तर किंवा वायव्य दिशेने विदर्भात हे उष्ण वारे दाखल होतात आणि पारा चढतो. वातावरणातील उष्म्याने तापलेले वारे भरभर वाहतात. उष्ण वारे एखादा अडथळा आला की, दिशा बदलतात. दिशा बदलताना वाºयाचा जोर अधिक असल्याने तेथे धुळीचे चक्र तयार होते. वारा पूर्णपणे दिशा बदलेपर्यंत हे चक्र फिरते. सहसा दहा ते पंधरा सेकंद किंवा त्याहून अधिक वावटळ राहते. एखादी दुचाकी खाली पाडण्यापर्यंतची ताकद या वावटळीत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.वराह, मोकाट कुत्री पळू लागलीपरतवाड्यातील आठवडी बाजारात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे वर्षभर पडूनच राहतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी एक वाजता अचानक वावटळ आली. परिसरातील केरकचरा, प्लास्टिक पन्नी आदी कवेत घेतले आणि गोल गोल फिरू लागली. ही वावटळ गोल फिरत खुल्या जागेवर असलेल्या मोकाट श्वानांपर्यंत आली. त्यातील एक श्वान त्या वावटळीत चक्क गोल फिरायला लागले. नागरिकांनी वावटळीच्या आसुरी शक्तीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
वावटळ : कचऱ्यासह कुत्र्यांना गोल-गोल फिरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 1:29 AM