कुजबूज
उज्वलाच्या घरच्या चुली पेटल्या
नरेंद्र निकम मोर्शी
केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर देशातील गरीब महिलांना स्वयंपाक करतांना त्रास होऊ नये, धुरापासून बचाव करून आरोग्य चांगले राहावे म्हणून उज्वला योजना अंमलात आणली. सुरुवातीला कमी दरात मिळणारा सिलिंडर आता नऊशेचा आकडा पार करून हजाराचा दिशेने निघाला. आधी सबसिडी पण चांगली मिळत होती. तीही आता विशीच्या आत आहे. गरिबांसाठी श्रीमंतांना सबसिडीवर पाणी पण सोडायला लावले. पण, आता स्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी व चहुबाजूची महागाई यामुळे सर्वसामान्यांना गॅस आणणे कठीण झाले आहे. धूर बंद करतांना सवयी बदलल्या पण उपाय नाही. गावातील पारावर गॅस भाववाढीचा विषय निघाला तेव्हा एक जण बोलून गेला उज्वलाच्या घरच्या चुली पेटल्या.