त्याचे झाले असे, की महापालिकेचे एक नियमित उपायुक्त १४ जूनपासून रजेवर आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यांचा पदाचा अतिरिक्त कार्यभार एका सहायक आयुक्तांकडे सोपविण्यात आला. मात्र, आयुक्तांच्या या तात्पुरत्या आदेशाने महापालिकेतील काही कथित वरिष्ठांना पोटशूळ उठला. त्या आम्हाला ज्युनिअर, आम्ही इतक्या वर्षांपासून जबाबदारी सांभाळतोय, सांभाळलीदेखील. मग आयुक्तांनी आमचे ‘सिनिअरनेस’ बघून तात्पुरता का होईना, उपायुक्तपदाचा कार्यभार द्यायला हवा होता, असा मौखिक आक्षेपच नोंदविला गेला. आयुक्तांच्या आदेशाने दुखावल्या गेलेल्या अन्य एका अधिकाऱ्यानेदेखील त्यांचीच री ओढत ‘साहेब, तुम्हारा चुक्याच’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. १० लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेत या नाराजीनाट्याची खमंग चर्चा होती.
प्रदीप भाकरे, अमरावती