शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

१.३३ कोटींचे लाभार्थी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 10:28 PM

महापालिकेतील विविध विभागांतील माहितीचे डिजिटायझेशन करून जीआयएस डाटाबेस निर्माण करण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचा दावा करून महापालिकेला १.३३ कोटींनी चुना लावला.

ठळक मुद्देसात माहिन्यांपासून चौकशी रखडली : कारवाईची तलवार की दोषसिद्धी ?

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेतील विविध विभागांतील माहितीचे डिजिटायझेशन करून जीआयएस डाटाबेस निर्माण करण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचा दावा करून महापालिकेला १.३३ कोटींनी चुना लावला. यात महापालिकेच्या एडीटीपी विभागात कार्यरत असलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी अर्थपूर्ण भूमिका वठविली.सात महिने होऊनही चौकशी पूर्ण न होऊ शकल्याने त्या अनियमिततेचे लाभार्थी कोण, हे अद्यापपर्यंत तरी गुलदस्त्यात आहे. आता आ.सुनील देशमुख यांनीच पुढाकार घेऊन याबाबत आयुक्त आणि चौकशी अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे विचारणा करावी आणि चौकशी अहवाल मागवावा, अशी अपेक्षा आहे.‘सायबरटेक’ला चौकशी समितीसमोर हजर करून या प्रकरणाचे ‘दुध का दुध..’ करण्याची भाषा करणारे चौकशी अधिकारी सात महिन्यांनंतरही या अनियमिततेची पाळेमुळे खणून काढण्यात यशस्वी झालेले नाहीत. सखोल चौकशीनंतर सायबरटेकच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, चौकशी समितीवरच सायबरटेकचा दबाव आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत ही चौकशी रेंगाळली आहे.मुळत: जीआयएस डाटाबेसचे हे कंत्राट १.६० कोटी रुपयांचे होते. मात्र, काम केल्याची खातरजमा न करता सायबरटेकला तेव्हा १.३३ कोटीं रुपये दिले. या गंभीर अनियमिततेच्या चौकशीचे निर्देश आ. सुनील देशमुख यांनी महापालिकेला दिले होते. सखोल चौकशीकरिता उपायुक्त (प्रशा.) यांच्या अध्यक्षतेत सात सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीने निविदेतील ‘स्कोप’ व करारनाम्याच्या अनुषंगाने सायबरटेक कंपनीने काम पूर्ण केले किंवा कसे, याबाबत तपासणी व सखोल चौकशी करावी तथा कुठल्याही परिस्थितीत अंतिम अहवाल ३० दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी २ जून २०१७ रोजी दिले. त्या अनुषंगाने महेश देशमुख यांच्या अध्यक्षतेत चौकशी समितीची बैठक घेण्यात आली. एडीटीपीसह संबंधित विभागाकडून माहिती मागविण्यात आली. सायबरटेकशीही संपर्क साधण्यात आला. त्या सर्व दस्तऐवेजांची विधी अधिकारी व अन्य तज्ञांकडून खातरजमा करण्यात आली आहे. मात्र, अंतिम अहवालाचे घोडे कुठे अडले, हे कळायला मार्ग नाही. आ.सुनील देशमुख यांनीच या प्रकरणातील अनियमितता उघड केली होती. त्यांनी दखल घेतल्याने आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. मात्र सात महिन्यांनतरही चौकशी अहवाल आला नसल्याबाबत ते कदाचित अनभिज्ञ असावे.‘दिवे’ लावणारा ‘तो’ अभियंता संशयाच्या भोवऱ्यातकरारनामा व कार्यारंभ आदेशात नेमून दिलेली कामे पूर्ण न करता तब्बल १.३३ कोटी रुपये सायबरटेकला देण्यात आले. सायबरटेकने काम पूर्ण केले, असा शेरा एडीटीपीतील एका अभियंत्याने मारल्याने कोट्यवधी रुपयांचे देयक काढण्याचे ते काम फत्ते झाले. यात त्या अभियंत्यासह अन्य काही जणांचे खिसे लाखांनी गरम करण्यात आले. आयुक्त नाकारत असताना काम ९० टक्के पूर्ण झाल्याची पोपटपंची तो अभियंता करतो. महापालिकेत कार्यरत असताना सायबरटेकची बाजू भक्कमपणे मांडतो. या प्रकरणात ‘दिवे’ लावणारा तो अभियंता मागील अनेक वर्षांपासून एडीटीपीत तळ ठोकून बसला आहे. चौकशी समितीनेही त्या दिव्यावरच नजर रोखली आहे.