शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

‘त्या’ ११३ पैकी व्यापारी कोण ?

By admin | Published: April 15, 2017 12:03 AM

तुरीचे शासरकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून व सध्या मार्केट यार्डात असलेल्या शेतकऱ्यांमधील १८० क्विंटलपेक्षा ....

१०० क्विंटलवर तुरीची विक्री : शनिवारी यादी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्दअमरावती : तुरीचे शासरकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून व सध्या मार्केट यार्डात असलेल्या शेतकऱ्यांमधील १८० क्विंटलपेक्षा अधिक तूर असणाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी मागितली होती. अशा ११३ शेतकऱ्यांची यादी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. यामध्ये व्यापाऱ्यांची तूर किती, याचा शोध महसूल व पोलीस यंत्रणा समन्वयातून घेणार आहे.शेतकऱ्यांच्या आडून व्यापाऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने तूर विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची तूर ४ हजार रूपये प्रतीक्विंटल दराने घेऊन ५०५० रूपये प्रतीक्विंटलच्या दराने शासकीय केंद्रावर विकण्याचा प्रकार व्यापारी करीत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याने नाफेड केंद्राद्वारा १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्यांना हुडकून काढण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांना दिलेत. तसेच मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या नावावर १०० क्विंटलपेक्षा अधिक तूर आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुप्तपणे निगराणी ठेवण्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार महसूल व पोलीस पथकांचा ‘वॉच’ मार्केट यार्डावर आहे. जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी शासकीय तूर खरेदी करणाऱ्या सर्व यंत्रणांकडून केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत १०० क्विंटलवर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली. २२ नंतर केंद्र सुरू होण्याची शक्यताअमरावती : यासर्व यंत्रणांनी शनिवारी अशा ११३ शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली. या यादीमधील शेतकरी व शेतकऱ्यांच्या आड व्यापाऱ्यांची पडताळणी आता महसूल व यंत्रणा करणार आहे. यामध्ये तफावत आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील.केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील नाफेड/व्हीसीएमएसचे ३, एफसीआयचे २ व डीएमओद्वारा सुरू असलेले ५ शासकीय तूर खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. राज्य शासनाने केंद्राकडे मुदतवाढ मागितली. परंतु अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही. मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी २२ एप्रिलनंतर केंद्र सुरू होणार असल्याचे माध्यमांना सांगितल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान बाजार समितीद्वारा ज्या शेतकऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत टोकन दिले त्या शेतकऱ्यांची तूर मोजली जाणार असल्याचे अमरावती बाजार समितीचे सचिव भुजंगराव डोईफोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१०० क्विंटलवर तूर विकणाऱ्यांची संख्यानाफेडद्वारा मोर्शी केंद्रावर ६ शेतकरी, एफसीआयच्या धामणगावच्या खरेदी केंद्रावर १८, नाफेडच्या चांदूररेल्वे केंद्रावर तीन, धामणगावरेल्वे केंद्रावर १, डीएमओद्वारा तूर खरेदी असणाऱ्या अचलपूर केंद्रावर १०, अंजनगाव सुर्जी ४, चांदूरबाजार १, दर्यापूर येथे ५६ व वरूड केंद्रावर ६ अशा एकूण ११३ शेतकऱ्यांनी १०० क्विंटलवर तुरीची विक्री केली.अशी होणार पडताळणीशेतकऱ्यांच्याआड १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध यंत्रणा घेत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावर चालूवर्षातील पेऱ्याची नोंद, सातबाराचे क्षेत्र व त्याची उत्पादकता, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, ओळखपत्र आदी रेकॉर्डची शहानिशा केली जाणार आहे.