फोटो मनीष तसरे यांच्याकडे
पान १
असाईनमेंट
अमरावती : शहरात ट्रिपल सीट दुचाकीचालकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. ते बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी सुमारे एक लाख वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यात ४ हजार ९०० पेक्षा अधिक ट्रिपल सीट वाहनचालक आहेत.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते. त्याचबरोबर अपघाताचाही धोका वाढतो. त्यानंतरही दररोज बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना ठेंगा दाखवत नियम पायदळी तुडविले जात आहेत. अनेक विद्यार्थी सुसाट ट्रिपल सीट जातात. समोरच्या चौकात वाहतूक पोलीस दिसले की, मागचा मागेच उतरतो. पोलीस नजरेआड झाले की, पुन्हा दुसऱ्याच्या मागे तिसरा बसून बेदरकारपणे वाहने हाकली जातात. पोलिसांची नजर चुकवून शहरात हटकून ट्रिपल सीट वाहने चालविली जातात.
////////////
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा
१) डावी-उजवीकडे वळताना हाताचे इशारे दिले पाहिजे.
२) प्रखर दिवे न वापरता दुचाकीचा वेग नियंत्रित असावा.
३) हेल्मेट वापरावे. हेड लाइट, ब्रेक लाइट, इंडिकेटर वेळोवेळी तपासा.
४) दोनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करू नये.
५) मोबाईलवर बोलत बाईक चालवू नये.
६) लहान मुलांना टाकीवर बसवू नका किंवा बॅक सीटवर उलटे बसवू नका.
//////////////////
किती जणांवर झाली कारवाई
जानेवारी : ७०६
फेब्रुवारी : ४४७
मार्च : ४५४
एप्रिल : ४९३
मे : ४४८
जून : ८४२
जुलै : ६९७
ऑगस्ट : ८४६
////////////
- तर पाचशे, हजारांचा दंड
ट्रिपल सीट : २००
विना लायसन्स : ५००
कर्कश हॉर्न : ५००
मोबाईलवर बोलणे : २००
वेगात वाहन चालविणे : १०००
राॅंग साईडने चालविणे: १०००
सायलेंसरचा मोठा आवाज : १०००
//////////