शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

बच्चू कडूंची पंचवार्षिक कोण आमदारकी रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:45 AM

Amravati : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपकडून रणनीती; ठाकरे सेनेचे 'वेट ॲन्ड वॉच'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्राचीन शहर आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे शहर असून, पुरातन वास्तू याची साक्ष देतात. अचलपूर शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले, तर सध्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रहारचे ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे आहेत. सलग चारदा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा बच्चू कडू हे रिंगणात असतील, यात दुमत नाही. त्यामुळे बच्चू कडूंची पंचवार्षिक आमदारकी कोण रोखणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारचे दिनेश बूब यांना ८५,३०० मते मिळाली. मात्र, आ. कडू यांचे गृहक्षेत्र असलेल्या अचलपूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी ६,७९३ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे आमदार कडू यांना विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी घेरण्याची तयारी चालविली. 'अभी नही तो कभी नही' असा चंग भाजप, काँग्रेसने बांधला आहे. त्यानुसार आ. बच्चू कडू यांच्यावर टीका व राजकीयदृष्ट्या त्यांची बदनामी करण्याची कोणतीही संधी इच्छुक उमेदवार सोडत नाहीत. बच्चू कडू हे विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरात एक आगळा-वेगळा सोशल चेहरा आहे. दिव्यांगांचे बळ, रुग्णसेवा, सामाजिक कर्तव्याची जाण आणि सहजतेने उपलब्ध होणारा आमदार अशी त्यांची अचलपूर मतदारसंघात ख्याती आहे. असे असले तरी चारवेळा आमदार असलेले बच्चू कडू यांच्याबाबत 'अॅन्टी इन्कमबन्सी' भरपूर आहे. नेमकी तीच 'कॅश' करण्यासाठी व्यूहरचना विरोधकांनी चालविली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, साजीक फुलारी, तर महायुतीतून भाजपचे नंदू वासनकर, प्रवीण तायडे, सुधीर रसे हे तिकिटाच्या स्पर्धेत आहेत, तर वंचित बहुजन आघाडी, रिपाइं, मनसेकडूनही अचलपुरात उमेदवारी दिली जाईल, अशी राजकीय जाणकारांची माहिती आहे. ठाकरे सेनेकडून उमेदवार कोण? याबाबत निर्णय गुलदस्त्यात आहे. एकंदरीत येत्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू विरुद्ध 'ऑल पॉलिटिकल पार्टी' असे अचलपूर मतदारसंघात चित्र रंगले, तर नवल वाटू नये, असे संकेत आहेत.

अचलपूर मतदारसंघाचे १९६२ ते २०२४ पर्यंत आमदार

  • १९६२ अण्णासाहेब वाटेणे (अपक्ष)
  • १९६७ नरसिंग देशमुख (काँग्रेस)
  • १९७८ वामनराव कोरडे (अपक्ष)
  • १९८० व १९८५ सुदामकाका देशमुख (अपक्ष, सीपीएम)
  • १९९० व १९९५ विनायक कोरडे (भाजप)
  • १९९९ वसुधा देशमुख (काँग्रेस) 
  • २००४ ते २०१९ बच्चू कडू (अपक्ष, प्रहार)

दर्यापूर मतदार संख्या  -  २,५३,३१८स्त्री -                               १,१९,१६३पुरुष -                             १,३४,१५४

२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालावर एक नजर...बच्चू कडू (प्रहार) : ८१,२५२बबलू देशमुख (काँग्रेस) : ७२,८५६

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूMLAआमदारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Amravatiअमरावती