लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला भक्तांसोबत रासलीलेसाठी चर्चेत आलेल्या मुरलीधर महाराजांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक व्हायलाच हवी होती, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३(२) मध्ये या कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.''स्वत:त विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वत:च पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तिशी लैंगिक संबंध ठेवणे तसेच मूल न होणाºया स्त्रीला अलौकीक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे'' या कृत्यांसाठी वर उल्लेखित कलमान्वये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होतात, अशी माहिती मानव यांनी दिली.चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा पोलिसांच्या हद्दीतील येलकीपूर्णा येथे मुरलीधर महाराजांचा मठ आहे. मुरलीधर महाराज यांनी मठात वास्तव्यास असलेल्या त्यांच्या भक्त तरुणींशी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. तळघरात असलेल्या स्नानगृहात ही रासलीला चालायची.महाराजांचा 'स्टायलीश लूक'अमरावती : खळबळ उडविणाºया या घटनेच्या काही चित्रफिती पुराव्यादाखल व्हायरल करण्यात आल्या होत्या; तथापि आम्ही स्वमर्जीने मुरलीधर महाराजांशी संबंध ठेवले असल्याचे संबंधित तरुणींनी बयाण दिल्यामुळे त्या संबंधांवर कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका घेऊन अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुरलीधर महाराजांना रान मोकळे करून दिले होते.महाराजांनी त्यानंतर सोवळे, उपरणे, फेटा या 'धार्मिक' वेशाऐवजी जीन्स, टी शर्ट आणि गॉगल असा 'स्मार्ट' वेश परिधान करणे सुरू केले. त्यांनी दाढीही काढली. पूर्वी महाराज असलेले मुरलीदास नारायणराव तायडे हे 'स्टायलीश लूक' असलेल्या पुरुषात परिवर्तीत झाले. काही टभक्तांसोबत त्यांनी अमरावती जिल्हा सोडला. राज्याबाहेर ज्या स्थळी ते वास्तव्यास होते, तेथील त्यांची छायाचित्रे मध्यंतरी व्हॉटस अॅपवर प्रसारीत झाली होती. त्यातही त्यांचा 'लूक' 'स्टायलीश'च होता.एसपी करणार का कारवाई?जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदाच ज्यांनी तयार केला, त्या श्याम मानव यांनी याप्रकरणी कारवाई व्हायलाच हवी होती, असे विधान केले आहे. कायद्यातील तरतुदीही त्यांनी सुस्पष्टपणे सांगितल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आता जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.-तर अधिकाऱ्यावर कारवाईहे प्रकरण तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या देखरेखीत पार पडले होते. त्यावेळी त्यांनी गुन्हे दाखल करावयास हवे होते. दक्षता अधिकाऱ्यांसमोर हे प्रकरण गेल्यास गुन्हे नोंदविणे हे त्यांचेही कर्तव्य ठरते, असे मानव यांनी स्पष्ट केले. पूर्वी जे झाले नाही, ते आताही होऊ शकते. मुरलीधर महाराजांवर गुन्हे नोंदवून अटक केली जाऊ शकते. पोलिसांनी चूक सुधारावी. पोलीस टाळाटाळ करणार असतील, तर संबंधित जबाबदार पोलीस अधिकाºयाविरुद्ध कारवाईच्या उपलब्ध तरतुदीनुसार अंधश्रद्धा निर्मूलन समिती कूच करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुरलीधर महाराजांना अटक का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:19 PM
महिला भक्तांसोबत रासलीलेसाठी चर्चेत आलेल्या मुरलीधर महाराजांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक व्हायलाच हवी होती, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देमानव यांचा सवाल : तर पोलीस अधिकाºयाविरुद्धच कारवाई!