शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लस देता का लस, शासकीयमध्ये दुष्काळ, खासगीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:11 AM

(असाईनमेंट) अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी व संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. मात्र, शासकीय लसीकरण केंद्राला ...

(असाईनमेंट)

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी व संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. मात्र, शासकीय लसीकरण केंद्राला नियमित पुरवठा होत नसल्याने बहुतांश केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढवत आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण बंद असल्याने लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून रांगा लागत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत पाच टप्प्यात लसीकरण होत आहे. यामध्ये आतापर्यंत ७,७०,४८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यात ५,८६,८९६ नागरिकांनी पहिला व २,०१ ७८८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. बहुतेक नागरिकांचा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यांचा विहित कालावधी देखील संपुष्टात आलेला असतांना लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना माघारी परतावे लागत आहे.

सुरुवातीला खासगी रुग्णालयांद्वारा कोविशिल्ड १९,५०० व कोव्हक्सिनचे ४८० डोस देण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण बंदच आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७,५५,५८० लसींचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये ५,२९,३३० कोव्हक्सिन व १,६३,२५० डोस कोव्हक्सिनचे आहेत. जिल्ह्यात रोज किमान १५ हजार डोसची आवश्यकता असतांना त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्र बंद राहत आहेत.

पाईंटर

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस : १,३७,१२३

दुसरा डोस : १३,१३८

४६ ते ४९ वयोगट

पहिला डोस : १,८९,९५१

दुसरा डोस : ७१,७४०

६० पेक्षा जास्त : १,७८,५९१

दुसरा डोस : ८७,०९४

---------------------------

शासकीय रुग्णालयात लसीकरण : ७,४०,४८६

खासगीमध्ये लसीकरण : १९,०००

-------------

१) लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना लसींचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर मात्र, खासगी रुग्णालयांचे लसीकरण बंद आहे. त्यांना आता कंपनीस्तरावर लस करावी लागणार आहे.

२) जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय रुग्णालयात लसीकरण होत आहे. याकरिता नियमित पुरवठा होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धेअधिक केंद्र बंद राहत आहे. या आठवड्यात लसींचा स्टॉक संपल्याने चार दिवस जिल्ह्यातील लसीकरण बंद होते. त्यामुळे नागरिकांना केंद्रांवरून माघारी परतावे लागले.

कोट

हेच का मोफत लसीकरण?

लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने गावातील लसीकरण केंद्र राहत आहे. केंद्र कधी होणार, याची माहिती मिळत नाही. याशिवाय कोव्हक्सिनचे डोसदेखील उपलब्ध नसतात.

भूषण पाटील, चांदूर बाजार

कोट

शासकीय लसीकरण केंद्रांवर रांगा राहत असल्याने खासगी रुग्णालय हा पर्याय आहे. यासाठी आवश्यक पैसे द्यायची तयारी आहेत. मात्र, एकाही खासगी रुग्णालयात लस उपलब्ध नाही.

रेणुका काळे, अमरावती

-----------------

कोट

लसीकरणासाठी नियमित पुरवठा होत नाही. मागणीच्या तुलनेत कमी डोस मिळतात. त्यामुळे लसीकरण केंद्र बंद राहतात. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नाही.

डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी