वडगाव माहोरे येथील घटना : हत्येनंतर मृतदेह जाळून विहिरीत फेकलाअमरावती : पत्नीने प्रियकरासोबत संगनमत करुन पतीची हत्या करुन मृतदेहाला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत वडगाव माहोरे येथे उघडकीस आली. गंगाधर मारोती ढेले (४५,रा. शेवंती) असे मृताचे नाव आहे. शेवंती येथील रहिवासी गंगाधर ढेले शेतमजुरी व जनावरे चराईची कामे करीत होता. तो आपली पत्नी व दोन मुलासह शेवंती येथे वास्तव्यास होता. २१ जानेवारीला गंगाधर घरी न परतल्याने त्याचा भाऊ बाळू याने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार केली होती. त्यांचा शोध पोलीस घेत होते. सोमवारी सकाळी ११.३० वाजता दरम्यान वडगाव माहोरे येथील दीपक माहुरे यांच्या शेतशिवारातील विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस पाटलाने नांदगाव पेठ पोलिसांना दिली. त्या आधारे तत्काळ पोलिसांनी दखल घेऊन घटनास्थळ गाठले.मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हानअनुशषंगाने सहायक पोलीस आयुक्त जी. एम. साखरकर, पोलीस निरीक्षक अनिल किनगे, एपीआय एल. एम. गवंड यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमक दलाच्या माध्यमातून विहीरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर हत्या झाल्याचे पोलीस चौकशी तपासात निदर्शनास आले. त्याआधारे नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाल्यावर गंगाधर हरविल्याच्या तक्रारीचा शोध पोलिसांनी घेतला. त्या आधारे नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. याप्रकरणी पोलिस चौकशी सुरु होताच मृताची पत्नी सीमा गंगाधर ढेले व तिचा प्रियकर रावसाहेब रामराव राजूरकर यांनी गंगाधरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी सीमा गंगाधर ढेले (३४) व तिचा प्रियकर रावसाहेब रामराव राजूरकर यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी पोलिस करीत आहेत.अशी केली गंगाधरची हत्यादोन ते तीन वर्षापासून सीमाचे शेवती येथील रहिवासी रावसाहेब राजुरकर नावाच्या व्यक्तीसोबत सूत जुळले. आपल्यामधील काटा काढण्याच्या प्रयत्नात सीमा व रावसाहेब यांनी संगनमत करुन १९ जानेवारीच्या रात्री गंगाधरला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. तो झोपल्यावर रावसाहेबाने गंगाधरचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळला. तो गतप्राण झाल्याचे पाहून त्यांचे हात पाय बाधण्यात आले. त्यानंतर गंगाधरचा मृतदेह दुचाकीवर बांधून वडगाव माहोरे येथील विहिरीवर नेला आणि पेट्रोलच्या साहाय्याने गंगाधरला पेटवून दिले. अर्धवट जळालेला मृतदेह विहिरीत ढकलून दिला. चित्रा चौकातून झोपीच्या गोळ्याची खरेदीहत्येची घटना उघड होताच पोलीस चौकशीला वेग आला काही तासामध्येच पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यामुळे गंगाधर याला देण्यात आलेल्या झोपीच्या गोळया कोणी दिल्या, याचा शोध पोलिसांनी सुरु केला होता. त्या चौकशीत चित्रा चौकातील एका मेडिकलमधून झोपीच्या गोळ्या खरेदी करण्यात आल्याचे पोलिसांना समजले. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
पत्नी, प्रियकराच्या संगनमतातून पतीची हत्या
By admin | Published: January 27, 2015 11:23 PM