शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 6:21 PM

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वन्यजीव विभागाने दीड कोटींहून अधिक लाडू जंगलात सोडले आहेत. जंगलात सोडलेले लाडू काळ्या मातीचे असून, त्यात बांबू बी टाकले आहे. मनुष्यबळाचा वापर करून हे खास ‘सीड बॉल’ वन्यजीव विभागाने बांधून घेतले. या मातीच्या लाडवातून बांबूचे बी वनक्षेत्रात रुजविण्याचा मेळघाटच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. या मातीच्या लाडवाच्या माध्यमातून जंगलात बांबूची लागवड करण्याचा, जंगलाची घनता वाढविण्याचा, जंगलातील अवघड ठिकाणांसह जंगलात जिथे बांबू नाही, त्या ठिकाणी ते रुजविण्याचा प्रयत्न झाला आहे.

आकोट वन्यजीव विभागात सर्वत्र, गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल, तारूबांदा, वैराट तसेच सिपना वन्यजीव विभागात सेमाडोह पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात हे लाडू मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहेत. यात वन्यजीव क्षेत्रातील मानवी वापर कमी करीत कुठलेही खड्डे किंवा खोदकाम न करता बांबू रोपांची लागवड झाली आहे. नर्सरीत बांबू रोप तयार करून त्या पॉलीथीन बॅगमधील बांबू रोपांची जंगल क्षेत्रात नेण्यापर्यंतचा होणारा खर्च टाळण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे.

चिकण मातीचे लाडू बांधण्यात चिखलदरा फॉरेस्ट ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थींसह गावपातळीवरील वनसमितीचाही सहभाग उल्लेखनीय राहिला. पहिल्या पावसातच हे लाडू फुटलेत अन् जागीच पसरलेत. या पसरलेल्या मातीत त्या बांबू बिया जागेवरच नैसर्गिक वातावरणात उगवल्यात. यातून बांबूची रोपं जंगलात वाढीस लागली. यात बांबू बियांची उगवण क्षमता अधिक राहली असून जवळपास ९० ते ९५ टक्के लाडवातून बांबूच्या रोपट्यांनी जंगलात पाय रोवले आहेत. जंगलातील गवतासोबतच त्यांनीही जागा मिळवली आहे. 

बांबू बियांनी लक्षावधी दिले कमवूनमेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत भवई-भुलोरी जंगल परिसरात ४०४ हेक्टर क्षेत्रातील बांबू १५ ते २० वर्षांत पहिल्यांदाच फुलावर आले. बांबूचे बी ग्रामस्थांनी गोळा केले. २०० रुपये किलो दराने ते भुलोरी ग्रामपंचायतने विकत घेतले. ग्रामपंचायतने हे बी ३०० रुपये किलोने विकले. राज्यातच नव्हे, तर मध्य प्रदेश वनविभागानेही हे बी विकत नेले. यात ग्रामपंचायतीला २३ लाख मिळालेत. मेळघाट वनक्षेत्रातही या बांबू बियांचा वापर केला गेला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती