लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोणटेक परिसरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण करीत आहेत. यासंदर्भात वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना निवेदन सादर केले. त्यांनी तात्काळ दखल घेत वनाधिकाऱ्यांना वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसंबंधी पत्र दिले असून, महापालिका आयुक्तांनीही बेवारस श्वानांचा बंदोबस्त लावण्यासंदर्भात पत्र दिले आहे.शहरानजीक असणाºया अकोला म्हाडा वसाहतीलगत झुडपी जंगलात काळवीट व हरिण या वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मात्र, शहरातील मोकाट श्वांना पकडून या जंगलात सोडण्यात येत असल्यामुळे तेथे श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे मोकाट श्वान वन्यप्राण्यांना फस्त करीत असल्याचे नुकत्याच एका घटनेवरून लक्षात आले. आठ दिवसांपूर्वी म्हाडा कॉलनी परिसरातील लोकटेक जंगलात हरणाची श्वानांनी शिकार केली. यापूर्वीही काही घटना उजेडात आल्या आहेत.वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी व पर्यावरणाची साखळी अबाधित ठेवण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी नीलेश कंचनपुरे यांनी शुक्रवारी मुख्य वनसरंक्षकांना निवेदनातून केली आहे. त्यांनी तात्काळ दखल घेत महापालिकेला व संबंधित क्षेत्राची जबाबदारी असणाºया वनधिकाºयांना सूचना दिल्या आहेत.
लोणटेक परिसरात वन्यप्राण्यांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:18 AM
लोणटेक परिसरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण करीत आहेत. यासंदर्भात वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना निवेदन सादर केले.
ठळक मुद्देश्वांनाचा मुक्त संचार : मुख्य वनसंरक्षकांनी घेतली दखल