शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर ‘बोमा’ पद्धतीने वन्यप्राण्यांचे ‘ट्रॅप’; राज्यात पहिलाच प्रयोग

By गणेश वासनिक | Published: August 18, 2024 8:48 PM

विधानसभा आचारसंहितेपूर्वीच विमानांचे ‘टेक ऑफ, लँडिंग’ ची चिन्हे

अमरावती : अमरावती विभागासाठी मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाची विकासकामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र, येत्या काळात विमानांचे ‘टेक ऑफ, लँडिंग’साठी अडसर ठरणाऱ्या वन्यप्राण्यांना विमानतळ परिसरातून बाहेर काढण्यासाठी ‘बोमा’ पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याकरिता वन विभागाने विमानतळाच्या परिसरात कार्यवाही सुरू केली असून, लवकरच वन्यप्राण्यांचे ‘ट्रॅप’ करून त्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षितपणे पाठविले जाणार आहे. वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी ‘बोमा’ पद्धत ही राज्यात पहिल्यांदाच अमरावतीत वापरली जात आहे.

बहुप्रतीक्षित बेलाेरा विमानतळाची विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बेलोरा विमानतळाचे लोकार्पण करण्याची राज्य सरकारने तयारी चालविली आहे. एटीआर-७२ आसनी विमान सेवा पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. अमरावती ते मुंबई, अमरावती ते पुणे या विमानसेवेसाठी राज्य शासनाने एका खासगी कंपनीसाेबत करारदेखील केला आहे. मात्र, बेलाेरा विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असल्याने ते भविष्यात विमानसेवेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या निर्देशानुसार बेलाेरा विमानतळ परिसरातून वन्यप्राणी पकडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत वापरल्या जाणारी ‘बोमा’ पद्धत अवलंबवली जात आहे.काय आहे ‘बोमा’ पद्धत

वन्यप्राणी जेरबंद करण्यासाठी ‘बोमा’ ही पद्धत वापरली जाते. यात वाय आकाराचे कुंपण तयार केले जाते. या भागाला पूर्णत: नैसर्गिक लूक असतो. वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू होण्यासाठी एक मोठा रॅम्प तयार केला जातो. तीनही बाजूंनी कप्पे तयार करून एका बाजूचा निमुळता आकार राहत असून, त्याच भागात वाहन उभे केले जाते. वाय प्रकारचा आकार तीनही बाजूंनी हिरव्या नेटद्वारे वेढला जातो. जंगलाच्या बाजूने वन्यप्राणी हाकलत आणून रॅम्पच्या निमुळत्या भागात लावण्यात आलेल्या अद्ययावत वाहनात हे वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू केले जातात. यापूर्वी मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यात ही पद्धत वापरली गेली आहे.वन विभागाकडून वन्यप्राणी पकडण्यासाठी बेलाेरा विमानतळ परिसरात पहिल्यांदाच ‘बोमा’ पद्धत अवलंबविली जात आहे. तयारी जाेरात सुरू असून, मध्य प्रदेशातून वाहन आणले जाणार आहे. या पद्धतीमुळे लवकरच विमानतळ परिसर वन्यप्राणीमुक्त होणार आहे.-ज्योती पवार, सहायक वनसंरक्षक, अमरावती