लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दरवपर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहाला आज ६६ वर्षे पूर्ण झालीत. देशात सर्वप्रथम १९५४ पासून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन सुरू केले आहे.पंडीत जवाहरलालजी नेहरू यांच्या वन्यप्राणीविषयक पे्रमातून, वन्यजीव संरक्षणात लोकांना सहभागी करून घेत वन्यप्राण्यांना अभय देण्याच्या प्रयत्यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा वन्यजीव सप्ताह सुरू केल्या गेला. देशभरात दरवर्षी हा वन्यजीव सप्ताह महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून २ ते ८ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जातो. वन्यजीवात वाघ, सिंह, हत्ती, गेंड्यापासून सर्व सूक्ष्म प्राण्यांचा, वनस्पतींचा समावेश होत असलची संकल्पना लोकमानसात रुजविण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून केला गेला. याला महात्मा गांधीच्या अहिंसा तत्त्वाची जोड दिली गेली. पुढे १९८३ पसून वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केल्या जाऊ लागला.इंदिरा गांधींचा दूरदर्शीपणाइंदिरा गांधींच्या दूरदर्षीपणामुळे वन्यप्राण्यांना, वन्यजीवांना कायदेशीर संरक्षण मिळाले. यातूनच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२, वन (संवर्धन) अधिनियम १९८०, वन्यजीव कृती योजना १९८३, वन्यजीव सुधारित अधिनियम अस्तित्वात आले. लोकप्रतिनिधींनी हे नियम पारित केलेत. १९५४ ते १९८६ दरम्यान भारतातील वने ऱ्हास होण्याची प्रक्रिया थांबली नाही. मात्र माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नातून दिलासा मिळाला आहे.व्याघ्र प्रकल्पदिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नातून १ एप्रिल १९७३ रोजी देशात व्याघ्र प्रकल्पाचा विचार पुढे आला. १९७४ ला संपर्ण देशात व्याघ्र प्रकल्पाची योजना कार्यान्वीत करण्यात आली. देशात सर्वप्रथम ९ व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आणल्या गेले. यातील एक मेळघाट व्याघ्र प्रकल्प. १९८५ मध्ये मेळघाट अभयारण्यासाठी पहिली अधिसूचना निघाली. १९८७ ला मेळघाटातच ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ अस्तित्वात आहे. २००६ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास’ म्हणून जाहीर केले गेले. डिसेंबर २०१८ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना आणि एकछत्री नियंत्रास मान्यता दिली.संपन्न वनक्षेत्रदेशांतर्गत महाराष्ट्रातील वनक्षेत्राची संपन्नता खऱ्या अर्थाने विदर्भाने सांभाळली आहे. ऋ तुमानाप्रमाणे आपले सौंदर्य बदलविाऱ्या मेळघाटात आज ५० वाघ आहेत. शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. जैविक विविधता व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनात याच मेळघाटाचे योगदान सर्वाधिक आहे.
वन्यजीव सप्ताहाला ६६ वर्ष, संपन्न जैवविविधता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:00 AM
पंडीत जवाहरलालजी नेहरू यांच्या वन्यप्राणीविषयक पे्रमातून, वन्यजीव संरक्षणात लोकांना सहभागी करून घेत वन्यप्राण्यांना अभय देण्याच्या प्रयत्यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा वन्यजीव सप्ताह सुरू केल्या गेला. देशभरात दरवर्षी हा वन्यजीव सप्ताह महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून २ ते ८ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जातो. वन्यजीवात वाघ, सिंह, हत्ती, गेंड्यापासून सर्व सूक्ष्म प्राण्यांचा, वनस्पतींचा समावेश होत असलची संकल्पना लोकमानसात रुजविण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून केला गेला.
ठळक मुद्देसंरक्षण-संवर्धनात नेहरुजींसह इंदिराजींचे योगदान : सप्ताहाला गांधीजींच्या तत्त्वाची जोड