लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शासनाने बाजार समित्यांत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देऊन पहिला प्रयत्न केला. आता जिल्हा बँकांमध्ये शेतकºयांना मताधिकार देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राज्य शासनामार्फत एक अध्यादेश काढण्यात येणार असल्याची शक्यता आहे.याअनुषंगाने सहकारी कायद्यात सुधारणा करावी लागणार असल्याने तसे विधायक हिवाळी अधिवेशनात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पाठोपाठ आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये कर्जदार शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा बँकेकडून कर्ज घेणाºया सर्व शेतकरी सभासदांना बँकाच्या निवडणुकीत थेट सहभाग घेता येणार आहे.या संदर्भात राज्य सरकारने सहकार खात्याचे अप्पर सचिव एस. एस. संधू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला नुकताच सादर केला आहे.याची राज्य सरकारच्या पातळीवर पुढील कारवाई व प्रक्रिया सुरू झाली आहे. हा निर्णय घेण्यासाठी सहकारी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ व किचकट असल्याने विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर हा कायदा लागू करण्यासाठी अध्यादेश काढला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुका होऊ घातलेल्या जिल्हा बँकाच्या निवडणुकीत शेतकरी मतदान करू शकणार आहे.दुसरीकडे या निर्णयासंदर्भात अनेक आक्षेप घेतले जात असून सत्ताधारी पक्षांचा पगडा सहकारी क्षेत्रावर नसल्याने हे क्षेत्र कमजोर करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. याचे मोठे पडसाद भविष्यात उमटू शकतात.राज्यातील मुंबई, जळगाव व चंद्रपूर जिल्हा बँका वगळता इतर सर्व जिल्हा बँका काँग्रेस व राष्टÑवादीच्या ताब्यात आहेत. हेच युती शासनाचे खरे दु:ख आहे. यामुळे असा निर्णय घेतला गेल्यास त्याचा हेतू शुद्ध नाही, हे उघड आहे.- बबलू देशमुख ,अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक
शेतकºयांना मिळणार जिल्हा बँकेतही मताधिकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:15 PM
शासनाने बाजार समित्यांत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देऊन पहिला प्रयत्न केला.
ठळक मुद्देअध्यादेश निघणार : राज्य शासनाचा शेतकºयांना खूश करण्याचा प्रयत्न