लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने तटाची उंची वाढविण्यासंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर निर्णय झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांक डून तसा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. कारागृहाच्या सुरक्षा आॅडिटनंतर तटाची उंची वाढविण्याबाबत मंथन सुरू झाले आहे.कारागृहात खून, दरोडे, मुंबई बॉम्बस्फोट, नक्षलवादी, प्रसिद्ध खटल्यातील आरोपी जेरबंद असल्याच्या पार्श्वभूमीवर गत आठवड्यात सुरक्षा आॅडिट करण्यात आले. कारागृहात सुरक्षेसाठी यंत्रसामग्रीची यादी पोलिसांचा विशेष शाखेकडून मागविली आहे. भविष्याचा वेध घेत कारागृहात सुरक्षासंदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सुरक्षा आॅडिट करण्यात आले आहे. बॉम्ब शोधक-नाशक पथकाने कारागृह सुरक्षेसाठी परिसर पिंजून काढला. तटाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असताना आॅडिट पथकाने सुपर एक्स्प्रेस मार्गावरून भविष्यात धोका असल्याचा अभिप्राय नोंदविला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कारागृहाच्या तटाची उंची वाढविणे गरजेचे आहे. सुपर एक्स्प्रेस मार्गावरून कारागृहाचा आतील भाग दिसू नये, अशी भिंतीची उंची राहील. आजमितीला या मार्गावरून कारागृहाचा बहुतांश भाग सहजतेने न्याहाळता येतो, असे चित्र आहे तसेच चांदूर रेल्वे मार्गालगतच्या नागरी वस्त्यांवर लक्ष ठेवण्याचा सूचना आहेत. कारागृहाच्या आत आणि बाहेरील दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कारागृहाच्या आतील भागात मुख्य स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. काही बराकीतसुद्धा सीसीटीव्ही कॅमेºयांनी कैद्यांच्या हालचाली टिपल्या जातात. ही व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.रिक्त पदांची वानवाकारागृहात १०५ कर्मचाºयांची पदे मंजूर असून, त्यापैकी २५ पदे रिक्त आहेत. कारागृह व खुले कारागृहाचा कारभार एवढ्याच मनुष्यबळाच्या आधारावर सुरू आहे. मुल्ला कमिटीनुसार सहा बंद्यांमागे एक कर्मचारी आवश्यक आहे. सुमारे एक हजार क्षमतेच्या कारागृहात किमान १६६ सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असून, नव्याने ९० सुरक्षा रक्षकांची गरज आहे.कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भात गत आठवड्यात आॅडिट झाले आहे. तटाची उंची वाढविण्यासाठी प्रथमत: चर्चा झाली असून, बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे यासंदर्भात अभिप्राय येणे बाकी आहे.- रमेश कांबळेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.
कारागृहाच्या तटाची उंची वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 1:13 AM
येथील मध्यवर्ती कारागृहाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने तटाची उंची वाढविण्यासंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर निर्णय झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांक डून तसा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
ठळक मुद्देसुपर एक्स्प्रेस मार्गावरून धोका : सुरक्षा आॅडिटनंतरच्या उपाययोजना