कारभारावर प्रश्नचिन्ह : अद्याप मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती नाहीअमरावती : राज्यात एकूण २३९ नगरपरिषदा आहेत. यामध्ये नव्याने १०० नगरपंचायती समाविष्ट झाल्यात. या नवनिर्मिती नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० नोव्हेंबरला होत आहे. मात्र, या नगरपंचायतींच्या कार्यकक्षा स्पष्ट ठरलेल्या नाहीत. मुख्यधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या नसल्याने या नवनिर्मित नगरपंचायतींच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. राज्यातील २३९ नगरपरिषदांच्या कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहेत. परंतु नवनिर्मित १०० नगरपंचायतींची कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य याविषयी कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे नगरविकासने स्पष्ट केलेली नाहीत. केवळ नगरपरिषद व नगरपंचायतींना सारखे अधिकार आहेत, असे सांगण्यात येते. याविषयी शासनाचे कुठलेही स्पष्ट आदेश नाहीत. नगरपंचायती ठरल्या शोभेचे बाहुलेअमरावती : नगराध्यक्षांची निवडणूक ३० नोव्हेंबरला झाल्यानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. त्या ठिकाणी आता मुख्याधिकारी राहतील. परंतु जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चारही नगरपंचायतीमध्ये अद्यापपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेल्या नाहीत. चांदूररेल्वेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने तेथल प्रभार हा धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. मात्र नव्याने गठीत नगरपंचायतींमध्ये कोण मुख्याधिकारी राहणार हे शासनाने स्पष्ट केलेले नाही. नगरपंचायतींची इमारत, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते, समिती प्रमुख यांना कक्ष, नगराध्यक्षांना वाहने, कर्मचाऱ्यांचे समयोजन, कराची आकारणी आदी विषयी शासनाने कुठलेही धोरण स्पष्ट केले नसल्याने नगरपंचायती शोभेचे बाहुले बनल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. मात्र नगरपंचायतीच्या कार्यकक्षा स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?
By admin | Published: November 24, 2015 12:17 AM