वाहने हटविण्याची नोटीस : कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार कोण?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध पार्किंगची समस्या कायमच आहे. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर हे दोन दिवसांपासून शासकीय बैठकीकरिता मुंबईला आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाकचेरीतील महत्त्वाच्या कामांची संपूर्ण जबाबदारी ही अपर जिल्हाधिकाऱ्यांची असते. मात्र, तेदेखील रजेवर असल्याने बुधवारीसुद्धा नो- पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांविरूद्ध कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कारवाई होणार नाही का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्दभट्टी हे सुद्धा काही दिवसापासून रजेवर असल्याने त्याचा प्रभार निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून विनोद शिरभाते यांच्याकडे आहे. सोमवारी वृत्त प्रकाशित होताच शिरभाते यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने कर्मचाऱ्यांकरिता नोटीस काढून परिसरातील विविध विभागाच्या प्रवेशव्दाराजवळ व नो- पार्किंगमध्ये वाहने न ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु नियमबाह्य वाहने लावणाऱ्या नागरिकांवर वाहतूक विभागाला सांगून काही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुपस्थित असतील तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवार्इंचे अधिकार नाहीत का? व जर असेल तर त्यांनी का कारवाई करू नये? असा प्रश्न चर्चेला काही जागृत नागरिकांच्यावतीने विचारल्या जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी वाहने काढलीविविध विभागाच्या प्रवेशव्दारनजीक नियमबाह्य वाहने पार्किंग केली जात आहे. हा प्रकार गंभीर आहे. पण काही अपंग कर्मचाऱ्यांना मुभा आहे. पण इतर अनेक कर्मचारी राजरोेसपणे कुठेही वाहने पार्किंग करतात, काही कर्मचाऱ्यांनी आरडीसींकडून बजावण्यात आलेल्या नोटीसमधील सूचनांचे पालन करून दालनाजवळ वाहने लावणे टाळले. तर काहींनी या आदेशाला न जुमानता प्रशासनाचे आदेश झुगारून वाहने लावण्याचा प्रकार सुरूच आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्हाकचेरीतून संपुर्ण जिल्ह्याच्या कामकाजाचे नियोजन ठरते. याच ठिकाणी जर नियम पाळल्या जात नसतील, तर नागरिकांनी व अन्य कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी काय आदर्श घ्यावा? लोकमतने हा प्रश्न लोकदरबारात मांडला आहे. पण तीन दिवसानंतरही कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन गंभीर नाही. केवळ जिल्हाधिकारी नाहीत, म्हणून कारवाई न झाल्याचे स्पष्ट आहे. नो- पार्किंगमध्ये कुणीही वाहने लाऊ नये, विभागाच्या प्रवेशव्दाजवळ वाहने लावणे नियमबाह्य आहे. पुन्हा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत व पोलिसांना सुद्धा कळविण्यात आले आहे. - विनोद शिरभाते, निवासी उपजिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांअभावी कारवाई होणार नाही का?
By admin | Published: May 18, 2017 12:24 AM