लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील प्रवीणनगरात नुकताच हत्येचा थरार घडला. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण प्रस्थापित होण्यासाठी अतिक्रमणाचा आधार घेत असल्याची बाब पुढे आली आहे. अतिक्रमित जागेत पानटपरी, हातगाड्याच्या व्यवसाय स्थळावरील वाढती गुन्हेगारी सामान्यजनांसाठी संकटाची चाहूल अधोरेखित करीत आहे. ही चिंताजनक बाब असून, याकडे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर लक्ष देतील का, असा सवाल सामान्य अमरावतीकर करीत आहेत.सांस्कृतिक वारसा लाभलेली अंबानगरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील प्रत्येक कान्याकोपऱ्यात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. छोटे-मोठे पानठेले, कॅन्टीन, हातगाड्या, अंडा सेंटर आदी व्यवसाय अतिक्रमित जागेवर फोफावले आहेत. हेच ठिकाण टवाळखोरांचेही अड्डे बनले आहेत. अशाच ठिकाणांचा आधार घेत गुन्हेगारी प्लॅनिंगसुद्धा आखल्या जातात, असा संशय बळावत आहे. शहरातील सातुर्णा स्थित देशी दारूच्या दुकानांसमोरच्या रस्त्यालगतच काही दिवसांपूर्वी एकाची हत्या करण्यात आली. आरोपीच्या हातगाडीवर स्नॅक्स खाण्यासाठी गेलेल्या त्या तरुणाची धक्का लागल्याच्या कारणावरून हत्या केली गेली. शनिवारी प्रवीणनगरात एका पानटपरीजवळ अल्पवयीनाची हत्या करण्यात आली. या ठिकाणी बोलावून त्या अल्पवयीनाला चाकूने भोसकण्यात आले. यापूर्वीही शहरातील अतिक्रमित स्थळांवर वाद-विवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. अतिक्रमित स्थळांची ही पार्श्वभूमी पाहता, ही स्थळे गुन्हेगारांचे अड्डेच बनले आहे. तेथूनच गुन्हेगारी घटनांची रूपरेषा आखली जाते. अशा व्यवसायाआड चालणाºया घडामोडींचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथे होणारे वादविवाद व गंभीर गुन्हे अमरावतीकरांच्या मनात भीती निर्माण करीत आहेत. याच अनुषंगाने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर शहरात ड्राइव्ह घेतील का? महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा देण्यासोबत आयुक्तांनी लक्ष घालून असे अड्डे नेस्तनाबूत केल्यास शहरातील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल, अशी अपेक्षाही अमरावतीकरांना आहे.अतिक्रमणाच्या मुद्द्यावर महापालिकेशी समन्वय साधला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस सुरक्षा पुरविली जाईल.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त.
गुन्हेगारांना अतिक्रमणाचा आधार पोलीस आयुक्त लक्ष देतील का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:22 AM
शहरातील प्रवीणनगरात नुकताच हत्येचा थरार घडला. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण प्रस्थापित होण्यासाठी अतिक्रमणाचा आधार घेत असल्याची बाब पुढे आली आहे. अतिक्रमित जागेत पानटपरी, हातगाड्याच्या व्यवसाय स्थळावरील वाढती गुन्हेगारी सामान्यजनांसाठी संकटाची चाहूल अधोरेखित करीत आहे.
ठळक मुद्देसामान्यजन असुरक्षित : अतिक्रमित व्यवसायस्थळांवर गुन्हेगारांचा वावर