अमरावती : शहरामध्ये प्रतिबंधित नायलाॅन मांजा कुठून येतो, तो कुठे साठविला जातो, तेथून तो कुठे वितरित होतो, हे माहित नसलेला पोलीस खात्यात विरळाच. सुत्रधारही सर्वांनाच ज्ञात, मात्र त्याचेविरूद्ध कुणी ‘ब्र’ काढायला तयार नाही. त्यामुळे आता काही फुटकळ दुकानदारांविरूद्ध कारवाई केली जाईल. मात्र, गांधीचौक व जवाहरगेटच्या मधोमध असलेल्या ‘त्या’ दुकानावर पुन्हा मेहेरनजर राखली जाते का, की तो कारवाईचा कक्षेत आणला जातो, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महापालिकेने गुरूवारी नायलाॅन मांजावर कारवाई करण्यासाठी पाच पथके नेमली.
पोलीस आयुक्तांच्या पथकासह गुन्हे शाखेने मंगळवारी नायलॉन मांजा विक्री करणार्यांसह साठवणूक करणार्यांच्या प्रतिष्टांनावर धाडसत्र राबविले. राहुलनगरातून फ्रेजरपुरा पोलिसांनी दुकानदार रहमान खान सुभान खान (५४, रा. साबनपुरा) याला, उस्माननगर येथून शेख रफीक शेख लाला (४७, रा. नालसाबपुरा) याला ताब्यात घेऊन नायलॉन मांजासह अन्य साहित्य असा एकूण ४० हजार ३५० रुपयांचा तर, मसानगंज परिसरातील रहिवासी दीप राकेश साहू (१८) याच्या ताब्यातून ६ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला. बडनेरा येथील भगतसिंग चौकातून चायना मांजाची विक्री करणाऱ्या राजेश पुंडलिक टरपे (३९, रा. जुनीवस्ती बडनेरा) या दुकानदारांकडे देखील मंगळवारी धाड टाकण्यात आली. गुन्हे शाखेने पकडलेले आरोपी संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासासाठी देण्यात आले. त्यांनी नायलॉन मांजा कुठून आणला, त्यांना बोलते केल्यास पोलीस यंत्रणा मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहोचू शकते, अशी दबक्या आवाजात पोलीस वतुर्ळात र्चचा आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे
महापालिकेने नेमली झोननिहाय पथकेनायलॉन मांजाने तरुणीचा जीव गेल्याच्या पाश्वभूमिवर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने कारवाईसाठी झोननिहाय पथके नेमली आहेत. महापालिकेच्या पाचही झोनअंतर्गत नायलाॅन मांजाची विक्री व साठवणूक करणार्या प्रतिष्टानांवर कारवाई करावी, असे निर्देश स्वास्थ अधीक्षक व जेष्ट स्वास्थ्य निरिक्षकांना गुरूवारी देण्यात आले.
पोलीस ठाण्यांकडून झाडाझडती
गुन्हे शाखा व पोलीस आयुक्तांच्या पथकाने २२ जुन रोजी चार ठिकाणी धाडी घालून सुमारे ५१ हजारांचा प्रतिबंधित नायलाॅन मांजा जप्त केला. त्याअनुषंगाने पोलीस ठाणेनिहाय नायलॉन मांजा विकणार्या दुकानदारांची झाडाझडती घेण्यात आली. मात्र, त्या पथकाच्या हाती फारसे काही लागले नाही. पोलीस पोहोचण्यापुवीर्च त्या दुकानदारांनी नायलॉन मांजाचा साठा रफादफा केल्याची माहिती आहे.