(असायमेंट)
अमरावती/ संदीप मानकर
केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप करण्याची कार्यपद्धत जाहीर केली आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील १५ वर्षांवरील २ लाख १० हजार ८९६ खासगी वाहने भंगारात निघू शकतात. ही धक्कादायक माहिती आरटीओने दिलेल्या आकडेवारीतून पुढे आली.
केंद्र शासनाच्या निर्णयावर अद्याप राज्य शासनाने कुठलीही अधिसूचना काढली नाही. परिवहन आयुक्तांनी संबंधित आरटीओ कार्यालयाला स्क्रॅप संदर्भात कुठलाही आदेश पाठविला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहने आहेत.
बॉक्स
गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट
१५ वर्षांवरील वाहनांची वयोमर्यादा संपलेल्या खासगी वाहने जर यांत्रिकदृष्ट्या रस्त्यावर वापरण्यास योग्य असेल, प्रदूषण होणार नाही, त्या मानकात जर वाहन बसत असेल, तर त्या वाहनांना पाच वर्षासाठी फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येईल. परिवहन (टॅक्सी) वाहनांना एका वर्षासाठी आरटीओचे शुल्क भरून फिटनेस सर्टिफिकेट मिळू शकते. फिटनेसकरिता कारसाठी ६०० दुचाकीसाठी ४००, तर परिवहन वाहनांसाठी ८०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
भंगारात दिल्यास मिळणार १५ टक्के लाभ
अद्याप शासनाची कुठलीही अधिसूचना जारी झाली नाही. मात्र, १५ वर्षांवरील २ लाख ११ हजार वाहने जिल्ह्यात आहेत. ती वाहने भंगारात निघाल्यास शासनाच्यावतीने १५ टक्के लाभ मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. शासनाची अधिसूचना निघाल्यानंतर अमरावती आरटीओसाठी धोरण जाहीर होईलच.
बॉक्स
भंगारातील दोन लाख वाहने धावतात रस्त्यावर
जिल्ह्यात सद्यस्थितीत १५ वर्षांवरील २,१०,८९६ वाहने आहेत. शासन सदर वाहनांना भंगारात काढून स्क्रॅप करणार आहे. सद्यस्थितीत २ लाख ११ हजार भंगार वाहने रस्त्यावर धावत आहेत. हे पर्यावरणासाठी हानीकारक ठरत आहेत. भंगार वाहनांमुळे अपघातसुद्धा वाढले आहेत.
कोट
केंद्र शासनाने पॉलिसी जाहीर केली आहे. मात्र, शासनाने यासंदर्भात कुठलीही अधिसूचना काढली नाही. त्यामुळे आम्हाला यासंदर्भात अद्याप कुठलेच आदेश नाहीत. आदेश प्राप्त झाल्यास पुढील धोरण ठरविण्यात येईल.
- राज बागरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी