लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेले महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बुधवारी सिद्धता होणार आहे. काँग्रेसच्या 'फायरब्रँड’ नेतृत्व अशी ओळख असलेल्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना नव्या सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळण्याचे जवळजवळ निश्चित आहे. या शक्यतेने काँग्रेसजनांमध्ये आनंदाला उधाण आले आहे.आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्यामुळे तिवस्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद प्राप्त होणार आहे. महिला मंत्री हीदेखील आगळी नोंद यशोमती ठाकूर यांच्या रूपाने होईल.‘मोदी लाटे’तही मतदारसंघ शाबूत राखणाऱ्या, तिसऱ्यांदा आमदार झालेल्या यशोमती ठाकूर यांनी राज्याच्या विधिमंडळात त्यांच्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षसंघटनेत दिली. कर्नाटक राज्यातील पेचप्रसंगांच्या वेळीही आमदार यशोमती ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. दिल्लीच्या राजकारणात महत्त्व निर्माण करू शकलेल्या यशोमती ठाकूर राज्यस्तरावरही दखलनीय नेतृत्व ठरल्या आहेत. त्यांच्या मंत्रिपदानंतर जिल्ह्याच्या विकासातही लक्षवेधी भर पडेल, अशी अपेक्षा त्याचमुळे व्यक्त होत आहे. पक्ष अडचणीत असताना प्रलोभनांना न भुलणाºया पक्षनिष्ठ नेत्या अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.राष्ट्रीय पातळीवरील अनुभव१९९९ ते २००४, २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिकमध्ये भाजपक्षाचे साहेबराव तट्टे आमदार होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. २००९ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर विजयी झाल्या. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती; पण मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर यांना संधी मिळाली नाही. २०१४ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर दुसºयांदा विधानसभेत पोहोचल्या. पक्षाने त्यांना मेघालय व कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रभारीपदाची जबाबदारी बहाल केली. पक्षसंघटनेत राष्ट्रीय स्तरावर सचिपवदही सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले. पुढे त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या यशोमती यांचे दिल्लीच्या राजकारणातही महत्त्व आहे.
यशोमती ठाकूर होणार कॅबिनेट मंत्री?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 6:00 AM
आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्यामुळे तिवस्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद प्राप्त होणार आहे. महिला मंत्री हीदेखील आगळी नोंद यशोमती ठाकूर यांच्या रूपाने होईल.
ठळक मुद्दे'फायरब्रँड' नेतृत्व : तिवसा मतदारसंघाला पहिल्यांदाच मिळणार सन्मान