अमरावती : कोरोना संक्रमण काळात रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी प्रधानमंत्री व केंद्रीय रसायन खते मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे विभागीय उपायुक्त संजय पवार यांच्यामार्फत निवेदनाव्दारे केली आहे.
संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहून केंद्र सरकारने खताच्या किमती वाढवून सामान्य शेतकऱ्यांना याचा त्रास होणार आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांचे आणखी एक संकट उभे ठाकले आहे. शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला असून आता या खताच्या किमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी प्रधानमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन खासदाराचेवतीने स्विय सहायक उमेश ढोणे यांनी २० मे रोजी विभागीय उपआयुक्त संजय पवार यांच्यामार्फत केंद्र शासनाकडे पाठविले आहे.