लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : अमरावती-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील आमनेर या ऐतिहासिक गावात मोहर्रम उत्सव हिंदू,मुस्लीम बांधव उत्साहात साजरा करतात. मुगल बादशहा औरंगजेबाचे वास्तव्य या गावात राहिले आहे.पूर्वीच आमदनगर, तर हल्लीचे आमनेर गाव आहे. लोकवस्तीचा विचार करता येथे हिंदू-मुस्लिम नागरिकांची संख्या समप्रमाणात आहे. मागील अनेक दशकांपासून येथे हिंदू मुस्लिमांचे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होतात. मोहर्रममध्ये हिंदू बांधव एकोप्याने हा सण घराघरांत साजरा करतात. या निमित्ताने लेकी, बाई, जावई, बाहेरगावी असलेलेसुध्दा उत्सवा साजरा करण्यास गावात येतात. विशेष म्हणजे येथील हजरत बाबा सय्यद शाहा जलालूद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष गजानन ईटनकर असून हिंदू मुस्लिम बांधवामिळून एकवटलेली ट्रस्ट आहे.आमनेर हे गाव वर्धा, जाम, कोलार व मदार अशा चार नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या संगमावरच नदीच्या पलीकडे भगवान शिव सोमनाथाचे भव्य मंदिर आणि भोसल्यांचे राज्य असल्याने मोनाराणीचा किल्ला आहे. काही अंतरावरच हजरत बाबा सय्यद शाह जलालुद्दीन यांचा दर्गा आहे. आमनेर हे एक ऐतिहासिक धार्मिक स्थळ असून येथे शेकडो पीर, औलीयांच्या मजारी, मंदिरे आहेत. या गावाला प्राचीन इतिहास आहे.आमनेरमध्ये हिंदू, मुस्लीम बांधव वर्षातून दोनवेळा उर्स साजरे करतात. पहिला उर्स इस्लामी प्रारंभ म्हणजे मोहरम मासाच्या नऊ तारखेला तर दुसरा उर्स रबी -उल - आखीर (ग्यारवी) मासाच्या नऊ तारखेला साजरा केल्या जातो. आमनेरचा उर्स, मोहरम, महाशिवरात्री यात्रा प्रसिध्द आहे. येथे दिवाळीप्रमाणेच मोहरम मध्येसुध्दा प्रत्येक घराची रंगरंगोटी आणि रोशनाई नागरिक करतात. मोहरमध्ये वाघ, सवाºया निघाल्या होत्या. बेसखेडा, ढगा, जलालखेडा, रोहणा, सह नागपूर जिल्ह्यातील अनेक सवाºया येऊन बाबा जलाउद्दीन यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
हिंदू-मुस्लीम एकतेचे साक्षीदार आमनेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 10:01 PM
अमरावती-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील आमनेर या ऐतिहासिक गावात मोहर्रम उत्सव हिंदू,मुस्लीम बांधव उत्साहात साजरा करतात. मुगल बादशहा औरंगजेबाचे वास्तव्य या गावात राहिले आहे.
ठळक मुद्देबंधूभाव : हिंदू, मुस्लीम भाविकांनी साजरा केला मोहर्रम उत्सव