शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:14 AM

परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीतील गैरप्रकारातील आरोपी लता राकेश वाजपेयी हिचा अटकपूर्व जामीन ...

परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीतील गैरप्रकारातील आरोपी लता राकेश वाजपेयी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अचलपूर न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. दुसरीकडे आरोपी सहायक सचिवांसह शिपाई शुक्ला व लता वाजपेयी हे तिघे पसार आहेत. २१ डिसेंबर रोजी याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी गुन्हे नोंदविले. दोन दिवसांनंतर सदर प्रकरणाचा तपास पुन्हा प्रथम चौकशी करणाऱ्या अचलपूर पोलिसांकडे वळते करण्यात आला. त्यानुसार ठाणेदार देवानंद वानखडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी दोन संचालकांनंतर कार्यरत सहा कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. एकंदर सर्व संचालक व १८ कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले जाणार आहे.

त्या दोघांची आशा मावळली

आरोपी लता राकेश वाजपेयी हिच्यावतीने वकिलांनी अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ एम. एच. पठाण यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. पोलिसांच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता गोविंद विचोरे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपी लता वाजपेयी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आरोपी सहायक सचिव मंगेश भेटाळू, शैलेश शुक्ला यांच्या अटकपूर्व जामिनाची शक्यता मावळली आहे.