आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा व शहरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांची हत्या केल्याचे ताजेच उदाहरण आहे. एसटीच्या महिला वाहकावर चाकूहल्ला झाला, युवतीची छेडखानी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना, अॅसिड व चाकूहल्ले होत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा कुठे तरी कमी पडत असल्याचा सवाल राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी बुधवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनातून केला आहे.अमरावती शहरात महिलाविषयक गुन्ह्यात वाढ झाली असून अमरावतीमधील महिला असुरक्षित आहेत. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच आहे. पोलीस काही दिवस मोहीम राबवितात. मात्र, काही दिवसांतच पोलिसांकडून मोहीम गुंडाळली जात असल्याचा आरोप संगीता ठाकरेसह पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. महिलावरील अत्याचार वाढत गेले, तर महिलांना घरातून बाहेर निघणे कठीण होईल, नोकरी करणे किंवा बाहेरील कामे करणे बंद करावे लागेल, अशी स्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक नसल्याचा आरोप संगीता ठाकरे यांनी केला. महिलासंबंधित अत्याचाराच्या कमी करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ व निरंतर कारवाई सुरू ठेवावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष सुचिता वनवे, संगिता देशमुख, कल्पना वानखडे, सारिका बोरकर, वंदना ठाकरे, ममता हुतके, राई देशमुख, सरला इंगळे, छाया कडू, नीलिमा कडू, माधुरी पोल्हाड, नीता वाटाणे, राजकन्या शिंंगराळे, सुषमा बर्वे, मनीषा कहाते आदी उपस्थित होते.शीतल पाटीलची हत्या करणाऱ्यांना अटक केव्हा?अमरावती : शीतल पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला आतापर्यंत का अटक करण्यात आली नाही, असा सवाल भीम आर्मीने पोलीस आयुक्तांना निवेदनातून बुधवारी केला. आरोपी मोकाट फिरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मीने सीपींकडे केली. यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीष साठे, राहुल नाईक, शेख अकबर, राजेश वानखडे, मनोज वानखडे, बंटी रामटेके, अनंदा इंगळे, पवन शेंडे, कपील नाईक, उमेश मेश्राम, विक्की वानखेडे, प्रवीण बन्सोड, अभिजित गोंडाणे, प्रितम हिरे, अशोक नंदागवळी, शरद वाकोडे, प्रवीण गजभिये, राजेश भटकर, राहुल भालेराव आदी उपस्थित होते.
महिला असुरक्षित, पोलीस कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:17 PM
जिल्हा व शहरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांची हत्या केल्याचे ताजेच उदाहरण आहे.
ठळक मुद्देसंगीता ठाकरे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना निवेदन