सृजनशीलता : विविध प्रकारचे ६० स्टॉल्स, आजी-माजी विद्यार्थिनींचा सहभाग अमरावती : भारतीय महिलांमध्ये जी सृजनशीलता आहे ती जगात इतरत्र कुठेही दिसत नाही. महिलांनी त्यांच्या सृजनशीलतेचा उपयोग स्वत:ला सक्षम व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी करावा, असे मत कुलगुरू मोहन खेडकर यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा मेळावा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थिनी व महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागातील रिसोर्स मॅनेजमेंट विषयाच्या सेमीस्टर तीनच्या विद्यार्थिनींनी विभागप्रमुख मनीषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कम्युनिटी इव्हेंट मॅनेजमेंट’ विषयाच्या प्रात्यक्षिकांर्तगत या मेळाव्याचे आयोजन जोशी हॉल येथे करण्यात आले होते. व्यासपीठावर कुलगुरु मोहन खेडकर, मोनिका खेडकर, नूतन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष माया शिराळकर, सचिव सोमण, सहसचिव पात्रीकर, प्राचार्य अविनाश मोहरील, गृहविज्ञान विभागप्रमख मनीषा काळे यांची उपस्थिती होती. गृहविज्ञान विभागातील अंशदायी शिक्षिकागौरी लवाटे व गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख शोभा गुल्हाने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. गृहविज्ञान विभागातील शिक्षिका अनुराधा देशमुख, संयोगिता देशमुख, प्र. न. रुडकर, नीता साकरकर, सीमा गुप्ता, मिर्झा यांचेही विशेष सहकार्य लाभले. गृहविज्ञान विभागाच्या रिसोर्स मॅनेजमेंटच्या रश्मी वानखेडे, दीपा घोरमाडे, मीनाक्षी काळे, मनीषा भालचक्र, रेवती देशमुख, समीक्षा गीरे व स्नेहल काटगरे या विद्यार्थिनींनी मेळाव्यासाठी प्रयत्न केले. मेळाव्यातील स्टॉल्सची संख्या ६० वर होती. यामध्ये दिवाळीचे विविध पदार्थ, दिवे, रांगोळी, पूजा साहित्य, विविध पौष्टिक पदार्थ, मंहेदी स्टॉल्स आदी होते. संचालन व आभारप्रर्दशन उज्ज्वला ढेवले यांनी केले. कार्यक्रमाला माजी गृहविज्ञान विभाग प्रमुख बिजवे दाम्पत्य, लता पुनवटकर, भावना वासनिक, सुजाता सबाने, लता हिवसे, सोनाली धांडे, विद्यार्थिनी, महिला शेतकरी, बचत गट सदस्या, महिला उद्योजिका, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी इतर पाहुण्यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
महिलांनी आर्थिक स्वावलंबन साधावे
By admin | Published: November 04, 2015 12:13 AM