शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अमरावतीत महिला 'अनसेफ'; गतवर्षी बलात्काराचे ९९, तर विनयभंगाचे २४४ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:26 IST

Amravati : सन २०२३ च्या तुलनेत गुन्हे घटले; तरीही महिला, मुली, अल्पवयीनांना धोकाच

प्रदीप भाकरे अमरावती : महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास त्या असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्यात बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. शहर आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्यात सन २०२४ मध्ये बलात्काराचे ९९, विनयभंगाचे २४४, पळवून नेण्याचे १२६ गुन्हे दाखल करण्यात आले. 

सन २०२३ च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये २० ने तर विनयभंगाच्या तक्रारीत ११४ ने घट झाली. सन २०२४ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाचे एकूण १३४ गुन्हे नोंदविले गेले. सन २०२३ मध्ये ती एकूण संख्या १७१ अशी होती. २०२२ मध्ये त्याबाबत १६० एफआयआर नोंदविले गेले होते.  ९९ गुन्हे सन २०२४ मध्ये बलात्काराचे दाखल झाले आहे. त्या सर्व घटनांची उकल झाली. त्यातील आरोपींना अटक झाली.

१२६ मुला-मुलींना पळविले मुला-मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्यात एकूण १२६ गुन्हे नोंदविले गेले. त्यातील १२१ प्रकरणांचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले. सन २०२२ मध्ये १११ मुला-मुलींना फूस लावून पळवून नेले होते. त्यातील १०० गुन्हे उघड झाले. सन २०२३ मध्ये ती संख्या १२१ अशी होती.

१५० कौटुंबिक छळाचे गुन्हे सन २०२४ मध्ये शहर आयुक्तालयातील महिला सेलमध्ये समेट घडून न आल्याने पती व सासरच्या मंडळींविरुद्ध १५० महिलांच्या तक्रारीवरून कौटुंबिक छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले. सन २०२३ मध्ये तो आकडा १४८ असा होता.

महिलांचा विनयभंग, जबरदस्तीही 

  • जानेवारी ते डिसेंबरदरम्यान महिलांच्या विनयभंगप्रकरणी एकूण २४४ गुन्हे नोंदविले गेले. पैकी २३० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. सन २०२३ मध्ये तो आकडा ३५८ असा होता. तेव्हा ३५० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला होता. 
  • शहर आयुक्तालयातील १० ठाण्यात गतवर्षी महिलांवरील बलात्काराचे ४९ गुन्हे नोंदविले गेले. 
  • सन २०२३ मध्ये त्या शिर्षाखाली ४३ गुन्हे नोंदविण्यात आले होते. सन २०२३ मध्ये बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ७६ गुन्हे, 3 विनयभंग व पॉक्सो अंतर्गत ९५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. सन २०२४ मध्ये बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ५० गुन्हे, विनयभंग व पॉक्सो अंतर्गत ८४ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

"सन २०२३ च्या तुलनेत मागील वर्षी महिलाविषयक गुन्हे घटले आहेत. पोलिस आयुक्तालय महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ बाय ७ सजग आहे. वर्षभर महिला सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविल्याचा तो परिपाक आहे." - कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त 

टॅग्स :WomenमहिलाAmravatiअमरावती