वाहतूक खोळंबली : परतवाडा-चांदूर बाजार मार्गावरील घटनापरतवाडा : परतवाडा-चांदूरबाजार मार्गावर कविठा (लाखनवाडी) फाट्यावर भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला चिरडले. या अपघातात महिलेचा भाऊ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान घडली. वृत्त लिहेस्तोवर घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल पोहचले होते आणि बंद झालेला मार्ग सुरळीत करण्यात आला. ट्रकमध्ये नागपूरहून कुरिअरचा माल आणला जात होता. जमावाने ट्रक पेटविलाअपघातानंतर ट्रक पलटी झाला. त्यावेळी संतप्त जमावाने ट्रकला आग लावली. परिणामी परतवाडा-चांदूर बाजार हा मुख्य रहदारीचा मार्ग जवळपास एक तास ठप्प होता. काही युवकांनी पत्रकारांना छायाचित्रे घेण्यासही मज्जाव केला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. गतिरोधक नसल्यानेच अपघात कविठा येथील थांब्यावर रस्त्याच्या तिन्ही बाजूने गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी अनेक दिवसांपासून केली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे सतत दुर्लक्ष केल्याने अपघातांची मालिका सुरु असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महिलेस चिरडले, जमावाने ट्रक पेटविला
By admin | Published: October 29, 2015 12:28 AM