लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी दाखविणाºया स्त्रियांनी तिवस्यात सोमवारी आयोजित महिलांच्या पोळ्यात हाती लाठ्या घेऊन दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. ‘आम्ही रडत्या नव्हे, तर लढत्या आहोत’ हेच त्यांनी त्यांच्या कृतीतून दर्शविले.कार्यक्रमाचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्रमंडळ, महिला काँग्रेस कमेटी व दारूबंदीसाठी लढणाºया महिलांनी केले होते. बैलांच्या मदतीने होणारी पारंपरिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. यांत्रिकीकरणाने जोर धरला आहे. महिलाही घरधन्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबतात. याची प्रचिती महिला शेतकºयांच्या बैलपोळ्यातून आली. यापोळ्याचे उद्घाटन आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण सभापती जयंत देशमुख, तिवस्याच्या नगराध्यक्ष राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष वैभव स. वानखडे, जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला पांडव, रंजना सतीश पोजगे, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, मुकुंद देशमुख, रूपाली काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव नसणे, वाढत्या शेतकरी आत्महत्या अशा विपरित परिस्थितीसोबत ताकदीने दोन हात करणाºया कर्तबगार महिला शेतकºयांचा सत्कार, प्लास्टिकमुक्त अभियान, दारूबंदीचे आवाहन, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिला शेतकºयांना मदत आदी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.महिला शेतकरी पुरस्कार दुर्गा बबनराव गंधे, सुनीता चौधरी, शीतल जाजू यांना प्रदान करण्यात आला. रोजगारनिर्मितीसाठी मोलाची कामगिरी बजावणारे रोहित बजाज, पुरूषोत्तम हरवानी, मंगेश वानखडे, वर्षा देशमुख, यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.महिलांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथदारूमुक्ती अभियानातून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. काठ्यांचे वाटप करून परिसरात महिला संरक्षण दलाच्या फलकाचे अनावरण यावेळी आ.यशोमती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. महिलांनी हाती काठ्या घेऊन दारूबंदीची शपथ घेतली.गृहिणीदेखील आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, रोजगारनिर्मिती व्हावी, अवैध दारूविक्री बंद करून व्यसनाधिनतकडे जाणाºया पुरूषांना व्यसनांपासून परावृत्त करण्याची शपथ दिली. स्त्रीशक्तीचा सन्मान व्हायलाच हवा. शेतीशी निगडित जोडधंदे वाढावेत, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा
तिवस्यातील महिलांच्या पोळ्यात दारूबंदीचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:59 PM
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी दाखविणाºया स्त्रियांनी तिवस्यात सोमवारी आयोजित महिलांच्या पोळ्यात.....
ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचे नेतृत्व : स्त्रीशक्तीने हातात घेतल्या काठ्या, ‘आम्ही रडत्या नव्हे, लढत्या’