सिटू ने घेतला पुढाकार
फोटो -
शालेय पोषण आहार, मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष
धामणगाव रेल्वे : कोरोनाकाळात शालेय पोषण आहार योजनेशी संलग्न महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात कोरोना संसर्ग झालेला असतानाही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याच्या मुद्द्यावर सोमवारी भर पावसात स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
सिटूचे प्रमुख तथा शेतकरी शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पंचायत समितीसमोरील तहसील कार्यालयाच्या परिसरात भर पावसात दोन तास धरणे आंदोलन या महिलांनी केले. पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा न करता ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, पोषण आहार महिलांना कामगाराचा दर्जा देऊन दरमहा १८ हजार रुपये मानधन मिळावे, ‘सेंट्रल किचन’चे धोरण बंद करावे कोरोनाकाळात शालेय पोषण महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
महिलांनी पंचायत समिती प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी यांना निवेदन दिले. यावेळी महादेव गारपवार, संगीता चौधरी, सीमा सडमाके, पद्मा नेवारे, साकिया बानो शाह, सुहासिनी नेमाडे, नलिनी पुराणिक, शीला नखाते, माया वानखडे, प्रफुल्लता आंबटकर, रंजना वानखडे, शोभा कुरडकर, सुनीता व्यवहारे यांची उपस्थिती होती.