शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

जुना धामणगावात कर्जाच्या नावावर महिलांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 9:59 PM

खादी ग्रामोद्योग विभागाचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कर्जाच्या नावावर ३५ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार जुना धामणगाव येथे उघड झाला.

धामणगाव रेल्वे : खादी ग्रामोद्योग विभागाचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत कर्जाच्या नावावर ३५ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार जुना धामणगाव येथे उघड झाला.महिलांनी विक्रम लाड (५०) व नितीन इंगोले (४५) या दोन तोतयांविरुद्ध मंगळवारी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, लाड व इंगोले यांनी १२ मार्च रोजी जुना धामणगावातील एका महिलेच्या घरी महिलांची बैठक घेतली. आपण खादी ग्रामोद्योग विभागाचे कर्मचारी असून, सर्व महिलांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये बेसिक कर्ज देऊ, अशी बतावणी केली. आधार कार्ड, मतदान कार्ड, छायाचित्र व प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्याचे त्यांनी सुचविले. त्यानुसार, ३५ महिलांनी प्रत्येकी एक हजार रुपये या दोन्ही तोतयांना दिले. १८ मार्च रोजी धामणगाव येथील स्टेट बँकेत सकाळी दहा वाजता येण्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार महिलांनी बँकेत गर्दी केली. मात्र, दिलेल्या वेळेला दोघेही आले नाहीत. त्यांचा मोबाइल बंद आढळून आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्व महिलांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे या घटनेचा तपास करीत आहेत.