शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रॅगिंगप्रकरणी महिला संघटना गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 9:47 PM

येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील वसतिगृहात अश्लील रॅगिंगप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील वसतिगृहात अश्लील रॅगिंगप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांच्याकडे केली.महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे या गुरुवारी वसतिगृहात मुलींसोबत संवाद साधण्यासाठी आल्या असता विद्यापीठात अभाविप सदस्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये व्हीएमव्हीच्या वसतिगृहातील सिनिअर्स मुलींनी ज्युनिअर्स मुलींना अश्लील रॅगिंग करण्यास भाग पाडले. ही बाब खेदजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रॅगिंगदरम्यान मुलींचे ऋतुस्त्राव तपासले गेले, हा प्रकार संतापजनक आहे. याप्रकरणी अन्यायग्रस्त मुलींनी संस्था संचालकांकडे तक्रार नोंदविली असतादेखील ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुलींनी न्यायासाठी मीडियाकडे धाव घेतली. अश्लील रॅगिंग प्रकरणाला खतपाणी घालण्यासाठी संस्थेच्या संचालकही दोषी असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने केली आहे. मुलींच्या वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी संस्थेची आहे. मात्र, मुलींच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून याप्रकरणी चौकशी केल्यास बरेच तथ्य बाहेर येतील, असे अभाविपने म्हटले आहे. निवेदन सादर करताना विजया चिखलकर, शिवानी मोरे, अबोली पांचाळ, सृष्टी राजगिरे, पायल गेडाम, करूणा आडे, शुभांगी बोरकर यांचा समावेश आहे.जिजाऊ ब्रिगेडने दिले संचालकांना निवेदनशासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या वसतिगृहात झालेल्या दुष्प्रकाराबाबत जिजाऊ ब्रिगेडने गुरूवारी संस्थेच्या संचालिका अर्चना नेरकर यांना निवेदन सादर केले. व्हीएमव्ही हे विदर्भातील नावलौकिकप्राप्त संस्था असून मुलींच्या वसतिगृहात झालेला प्रकार नावलौकिकास गालबोट लावणारा आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय शिक्षणाचे स्त्रोत असताना संस्थेच्या दुर्लक्षामुळे मुलींच्या वसतिगृहात हिडीस प्रकार घडला आहे. वसतिगृहात सॅनिटरी नॅपकीन इन्सिलेटर उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींची प्रचंड कुचंबना होते. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात आवश्यकतेनुसार उच्च दर्जाचे व संरक्षित सॅनिटरी नॅपकीन इन्सिलेटर त्वरीत लावण्यात यावे, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या मयुरा देशमुख, कीर्तीमाला चौधरी, शीला पाटील, प्रतिभा रोडे, कल्पना वानखडे, मनाली तायडे, सुशीला धाबे, कांचन उल्हे, मैथिली पाटील उपस्थित होते.