शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

२७ ठिकाणी महिला स्वच्छतागृहे

By admin | Published: June 27, 2017 12:10 AM

अंबानगरतील महिलांसह शहरात विविध कामांनी येणाऱ्या महिलांची कुुचंबणा थांबविण्यासाठी महापालिका २७ ठिकाणी महिला प्रसाधनगृहांचे बांधकाम करणार आहे.

जागा निश्चित : टप्प्याटप्प्याने होणार बांधकामलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरतील महिलांसह शहरात विविध कामांनी येणाऱ्या महिलांची कुुचंबणा थांबविण्यासाठी महापालिका २७ ठिकाणी महिला प्रसाधनगृहांचे बांधकाम करणार आहे. ‘फायबर टॉयलेट’चा प्रयोग अयशस्वी झाल्याने प्रशासन यानवीन प्रयोगासाठी सावध पावले उचलत आहे. शहरातील विविध भागात महिला स्वच्छतागृहांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.तत्कालीन स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या पुढाकाराने या योजनेला मूर्तरूप देण्यात आले होते. महिला प्रसाधनगृहासाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीमधून महिला स्वच्छतागृहावर खर्च केला जाईल. महिला प्रसाधनगृहाची देखभाल व दुरूस्तीची कामे ‘पे अ‍ॅन्ड यूज’ च्या धर्तीवर ३० वर्षांकरिता करण्यात येणार आहेत. यासाठी सुमन इंटरनॅशनल व सुदर्शन समाज बहुउद्देशीय विकास संस्था नागपूरशी करारनामा करण्यात आला आहे. २७ पैकी पहिल्या टप्प्यात पाच व दुसऱ्या टप्प्यात आणखी ५ प्रसाधनगृहे बांधली जातील. उच्च न्यायालयाच्या निर्देशाने महिला प्रसाधनगृहांचे बांधकाम केले जाणार आहे. नवसारी बसस्टॉप, गाडगेबाबा समाधी मंदिराजवळ, पीडीएमसीजवळ, शेगांव चौक, कठोरा नाका (मजीप्रा पाण्याच्या टाकीजवळ), मास्टर मेडीकल लगत, सबनिस फोटो स्टुडिओलगत, शवविच्छेदनगृहाजवळ, शिवटेकडी रोडनजीक, चित्रा चौक, इतवारा बाजार मार्केटमध्ये, प्रभात चौक (जुन्या मुतारीजवळ) प्रभात टॉकीजमागे, नगर वाचनालयाजवळ राजकमल, चापोरकर कॉम्प्लेक्स मागे नमुना, राजापेठ जॅक अ‍ॅन्ड जिल शाळेजवळ, राजापेठ सियाराम शोरूमलगत, पूज्य बाबरी दरबारालगत, शहर कोतवालीसमोर, मनपा मुख्यालय, यशोदानगर, शुक्रवार बाजार, दक्षिण प्रभागीय कार्यालयाजवळ, दर्ग्याजवळ जुनीवस्ती बडनेरा, नवाथेनगर, दस्तुरनगर (गोरक्षणसमोर), सराफा बाजारामध्ये (जवाहर गेट) येथे महिला स्वच्छतागृह बांधले जाणार आहे. महिला प्रसाधनगृहांसाठी शहरात २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने स्वच्छतागृहांची उभारणी केली जाईल.-सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा