- अनिल कडूपरतवाडा (अमरावती) : पूर्व मेळघाट वनविभागाच्या अभिलेख्यांसह, मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाकडे वनाधिकाऱ्याने पाठविलेले सागवान लाकूड संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. लाखो रुपये किमतीच्या या कटसाईज लाकडाने वनविभागापुढेच एक आव्हान उभे केले आहे. हे कटसाईज लाकूड चिखलदरामार्गे परतवाड्यात दाखल झाले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एकछत्री नियंत्रणांतर्गत पुनर्रचनेनंतर पूर्व व पश्चिम मेळघाट वनविभागाचे एकत्रिकरण करण्यात आले. यातून मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा अस्तित्वात आला. या अनुषंगाने पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदराकडील अभिलेखे मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाडे लाकूड चिखलदऱ्याहून मेळघाट वनविभागाच्या विभागीय कार्यालय परिसरातील गोडावूनमध्ये पोहचले आहे.या लाकडाबाबत मेळघाट वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित वनाधिकाºयाला विचारणा केली असता, या लाकडाबाबतचे कुठलेही विवरण नाही. कारटिंग चलान नाही. लाकूड अधिकृत की, अनधिकृत याची स्पष्टता दर्शविणारा दस्तऐवज नाही. या अनुषंगाने उपवनसंरक्षक अविनाशकुमार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
चिखलदºयाहून परतवाड्यात दाखल, जवळपास एक मॅट्याडोअर भरून असलेले हे कटसाईज सागवान लाकूड चिखलदरा वनविश्रामगृहाच्या कामातील शिल्लक लाकूड आहे. चिखलदरा विश्रामगृहाचे काम परतवाडा येथील लाकूड फर्निचर व्यावसायी ठेकेदाराकडून वनाधिकाऱ्यांनी करवून घेतले आहे. यास लागणारे लाकूड वनविभागाने पुरविल्याचे सांगितले जात आहे.
कारटिंग चलान/ वाहतूक पासचिखलदऱ्याला आरागिरणी नाही. वनविभागाला जंगलातील लाकूड परस्पर वापरायचे असल्यास त्यास वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते. आवश्यक लाकूड वनविभागाच्या शासकीय लाकूडविक्री डेपोतूनच घ्यावे लागतात. त्याला कारटींग चलान हवे असते. आरागिरणीवर लाकूड कापून कटसाईज लाकडाची वाहतूक करताना वाहतूक पासही सोबत असावी लागते. वनाधिकाºयालाही वनविभागाचे नियम लागू पडतात.
तपासणी नाकेचिखलदरा - धामणगाव गढी - परतवाडा आणि चिखलदरा - घटांग - बिहाली - परतवाडा या दोन्ही मार्गावर वनविभागाचे दोन स्वतंत्र तपासणी नाके आहेत. यात या तपासणी नाक्यांची भूमिकाही संशयास्पद ठरली आहे. दरम्यान, या लाकडाच्या निमित्ताने घटांगही चर्चेत आले आहे.
चौकशीचा भागसंबंधित ठेकेदाराला त्या कामाचे बिल लाकडासहीत अदा केले की लाकूड वगळून अदा केले गेले? मोजमाप पुस्तिकेत नेमके काय नोंदविल्या गेले, काम संपल्यानंतरही तब्बल पाच ते सहा महिने ते लाकूड चिखलदऱ्यात किंवा इतरत्र कशाकरिता ठेवले गेले, कुणी ठेवले किंवा कुणी ठेवून घेतले, यासह दोन्ही मार्गावरील तपासणी नाक्यावरून विनाथांबा हे लाकूड पुढे कसे सरकले. लाकूड नेमके कुठले, हा आता चौकशीचा भाग ठरत आहे.
रेकॉर्डवर घेण्याचा प्रयत्नहे लाकूड परतवाडा डोपोकडे वर्ग करून रेकॉर्डवर घेण्याचा संबंधित वनाधिकाऱ्याचा प्रयत्न आहे. पण परतवाडा लाकूडडेपोत येणारे लाकूड, त्यासोबत आलेल्या कारटींग चलानद्वारेच रेकॉर्डवर घेतले जाते. वनगुन्ह्यातील मालही वनगुन्हा विवरणासह असलेल्या चलानद्वारेच रेकॉर्डवर चढविण्याची पद्धत आहे. त्यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.