लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियंत्यांचे आराध्य दैवत सर मोक्षगुंडम विश्र्वेसरैया यांनी त्यांच्या काळात केलेली कामे आजही टिकून असून ते सर्व अभियंत्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. सर्वांनी त्यांचे अनुकरण केल्यास सन २०२० पर्यंत शासनाने पाहिलेले स्वप्न साकार होऊन भारत देश महासत्ता होईल, असे प्रतिपादन ना. प्रवीण पोटे यांनी केले. ते येथील अभियंता भवनात शुक्रवारी आयोजित सुवर्ण जयंती महोत्सवी अभियंता दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.यावेळी ना. प्रवीण पोटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी २०० रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग घेतला. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सी.व्ही तुंगे, गोविंद कासट, तंत्रशिक्षण विभागाचे सह. संचालक डी. एन. शिंगाडे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे, प्राचार्य आशा अंभाईकर, इंस्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सचे लोकल सेंटरचे चेअरमन आनंद जवंजाळ, अरविंद मोकदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एन.एन. खालसा यांनी केले. यावेळी स्पर्धा परीक्षा प्रश्नमंजूषा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. प्रदीप कोल्हे, राम विघे, गणेश बारब्दे, शरद मोहोड, प्रताप निकम, नरेंद्र दापूरकर यांची उपस्थिती होती.
सर विश्र्वेसरैया यांचे कार्य दीपस्तंभासारखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:34 PM
अभियंत्यांचे आराध्य दैवत सर मोक्षगुंडम विश्र्वेसरैया यांनी त्यांच्या काळात केलेली कामे आजही टिकून असून ते सर्व अभियंत्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे.
ठळक मुद्देअभियंता दिन : पालकमंत्र्यांचे प्रतिपादन