अमरावती : जिल्हा परिषदेत कार्यरत अभियंता संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांची पूर्ण होत नसल्याने अभियंत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी झेडपीतील बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यानी गुरूवारी काळ्याफिती लावून कामकाज केले.आता सर्व अभियंते व संघटनेचे पदाधिकारी येत्या १९ आणि २० मार्च रोजी सामुहीक रजा आंदोलन करणार आहेत. याबाबत १३ मार्च रोजी सीईओ मनीषा खत्री व अॅडिशनल सीईओ विनय ठमके यांना संघटनेने दिलेल्या निवेदन दिले. याबाबत संघटनेने ९ वेळा ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठकी घेतल्यात. तेव्हा केवळ आश्वासने देऊन समाधान करण्यात आले. त्यामुळे आता नोंदणीकृत संघटनेला शासनाने मान्यता द्यावी, दरमहा दहा हजार मासिक वेतन देणे,नवीन उपविभाग निर्माण करणे, ग्रामविकास विभागाचे आदेश निर्गमित करणे यासाठी अभियंत्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप कदम, राजेश रायबोले, संजय उमप, पी.टी.वानखडे, राजेश लाहोरे, जयंत शिरभाते, हेमंत लोखंडे, रितेश मेंढे व अन्य अभियंता सहभागी झाले आहेत.
झेडपीच्या अभियंत्यांचे काळ्याफिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:35 AM
जिल्हा परिषदेत कार्यरत अभियंता संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांची पूर्ण होत नसल्याने अभियंत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी झेडपीतील बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यानी गुरूवारी काळ्याफिती लावून कामकाज केले.
ठळक मुद्देआंदोलन : १९ व २० मार्चला सामूहिक रजेवर