निवेदन;लाॅकडाऊन हटविण्याची मागणी
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हटविण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शहरातील कामगारांनी गुरुवारी जिल्हाकचेरीवर धडक दिली.यावेळी आपल्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना साेपविण्यात आले.
राज्य शासनाने कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात ५ ते ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्हाभरात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. त्यापूर्वी जवळपास तीन महिने लॉकडाऊन होता. परिणामी लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. परिणामी कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्न या कामगारा समारे उभा ठाकला असता, अशातच आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे व्यापार बंद आहे. त्यामुळे मजुरांना रोजगार नाही. या प्रकारामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगार वर्गासमाेर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगाराची बिकट स्थिती लक्षात घेता. शासनाने लागू केलेला लॉकडाऊन त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी कामगारांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली. यावेळी आनंद आमले, आपचे अलीम पटेल, देशमुख, अमर ठाकूर, मंगेश कांबे, दिनेश कोतवाल, आशिष बडगे, अमर सकरवार, सुशील देशमुख, शुभम मेश्राम, राहील मेमन व कामगार उपस्थित हाेते.