आगळा उपक्रम : शेकडो छायाचित्रकारांचा सहभागअमरावती : जागतिक छायाचित्रदिनाच्या निमित्ताने १९ आॅगस्ट रोजी शहरातून कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीचे उदघाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, जलसंधारण मंत्री राम शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एपीव्हीपी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव दलाल होते तर रूपेश फसाटे, मनीष जगताप, महेश सबनिस, अरविंद भुगूल, गजानन अंबाडकर, सुयोग पापळकर चैतन्य मोहने, आदींसह अनेक ज्येष्ठांचा यावेळी सहभाग होता. पालखीत कॅमेरा ठेऊन दिंडी काढण्यात आलसी. ठिकठिकाणी शहरात या दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अरूण पवार, सचिन रासने, राजू पांडे तसेच गाविलगड प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाचे प्रमुख गुंजन गोळे, पवन शर्मा, यांची उपस्थिती होती. राजकमल चौकात कॅमेरादिंडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. जयस्तंभ चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थी व सबनीस फोटो स्टुडिओ, विमल लॅबद्वारे दिंडीमधील सहभागी लोकांसाठी पाण्याची तसेच सरबताची सोय करण्यात आली होती. यावेळी गुणवंत कोठारी, बारू केचे, निखिल गाले, अविनाश भाकरे, अजिंक्य सातपुते, निखिलेश तिवारी, शुभम् सातपुते, प्रदीप नवले, अनंत जामोदकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जागतिक छायाचित्रदिनी ‘कॅमेरादिंडी’
By admin | Published: August 22, 2016 12:10 AM