परतवाडा : वरली मटका जुगारावर धाडीच्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. व अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, हेडकॉन्स्टेबल त्र्यंबक मनोहर, नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद खर्चे, नीलेश डांगोरे, कॉन्स्टेबल प्रवीण अंबाडकर व चालक हेडकॉन्स्टेबल दिनेश पागधुने यांच्या पथकाने परतवाडा शहरातील श्याम टॉकीजजवळ कारवाई केली.
२७ डिसेंबरला केल्या गेलेल्या या पहिल्या कारवाईत संतोष गोठवाल (६०) व गणेश पाचपौर (दोघेही रा. परतवाडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक वरली मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी, दहा रुपयांचा एक पेन, ३ हजार १७० रुपये रोख आणि १२०० रुपयांचा एक मोबाईल मिळून एकूण ४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत गौस मोहम्मद खान ऊर्फ कालू नजीर मोहम्मद खाँ (६४, रा. परतवाडा) व सुरेश गोयल (५५, रा. कांडली, परतवाडा) यांना पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून वरली मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी, एक पेन, एक मोबाईलसह १४ हजार ८१० रुपये रोख असा एकूण १५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.