लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आकृतिबंध व कार्यालयातील रचना करताना राज्य संघटनेने दिलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार झाला नाही, असा आरोप संघटनेने केला. याचा विचार व्हावा व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आरटीओतील कामकाज प्रभावीत झाले.राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंध व कार्यालयीन रचना या मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असल्याने वर्ग ३ च्या कर्मचाºयांच्या भवितव्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कर्मचाºयांच्या आकृतिबंध व कार्यालयीन रचना कशी असावी, याबाबत संघटनेने १६ डिसेंबर २०१६ रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्यावर परिवहन आयुक्तांची राज्य संघटनेशी चर्चाही झाली. मात्र, शासनाने संघटनेचा प्रस्ताव विचारात घेतला गेला नाही. त्यामुळे ५ सप्टेंबर २०१७ रोजी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला होता. परिवहन आयुक्ताशी झालेल्या चर्चेत सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचननेनुसार आंदोलन स्थगित करत राज्य संघटनेने सुधारित प्रस्ताव सादर केला होता. दखल न घेतल्याने आरटीओच्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने शुक्रवारी लेखणीबंद आंदोलन केले. आंदोलनात संदीप खवले, अमोल माटोडे, मंगेश देशमुख, उज्ज्वल ठाकरे, प्रमोद राजनेकर, राजेश पाटील, साजिद अली, संदीप अडागळे, मनोज खोब्रागडे, नितीन मुखे, रवींद्र रुद्रकार, श्याम बडेल, आशिष प्रधान, गजानन धुर्वे, प्रफुल्ल खोब्रागडे, शालिनी रामटेके, कल्पना डोळके, स्वेता वैद्य, स्मिता शिरमलवार, रोहिणी दातार, अस्विनी चव्हान, दीपाली गवळी, दिलीप नाचणे, प्रमोद निबोरकर, धीरज गुलाने, स्वप्नील सहारे आदींचा समावेश होता.आकृतिबंध व कार्यालयातील रचना करताना राज्य संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार केला नाही. वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने लेखणीबंद आंदोलन पुकारले. याचीही दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू.- अनिल मानकर, राज्य उपाध्यक्ष, मोटार वाहन संघटना
लेखणीबंद आंदोलन आरटीओतील कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:13 PM
आकृतिबंध व कार्यालयातील रचना करताना राज्य संघटनेने दिलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार झाला नाही, असा आरोप संघटनेने केला. याचा विचार व्हावा व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आरटीओतील कामकाज प्रभावीत झाले.
ठळक मुद्देलक्षवेध : मोटर वाहन संघटना एकवटली