लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासमक्ष पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी गुरुवारी प्रशासनाला दिल्या.तिवसा विधानसभा मतदारसंघात तिवसा, भातकुली, अमरावती आणि मोर्शी तालुक्यातील काही गावे येतात. बहूतांश गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार ते आठ दिवआड पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणात हातपंप बंद असूनस विहीर खोलीकरणाची आवश्यकता आहे तसेच बोअरवेलची मागणीदेखील आहे. विहीर अधिग्रहण गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे, अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पुढील मे आणि जून महिन्यात ही समस्या अधिक तीव्र होईल. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी सुनावले. जिल्हाधिकाºयांनी जी कामे मंजूर आहेत, ती तातडीने मार्गी लावावीत. टँकरची मागणी असेल, तर तात्काळ सुरू करावे. विहीर अधिग्रहणाची कार्यवाही करावी. कूपनलिका घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषद व मजीप्रा कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी दिल्या. यावेळी झेडपी बांधकाम सभापती जयंत देशमुख, सदस्य अलका देशमुख, मुकुंद देशमुख, नराध्यक्ष वैभव वानखडे, हरिभाऊ मोहोड, बबलू मक्रमपुरे, विद्या बोडखे, रंजना पोजगे, लुकेश केने, संदीप आमले, रवी राऊत, रमेश काळे, नितीन डहाणे, पवन काळमेघ, गजानन ढवळी, पंकज देशमुख, अतुल यावलीकर, वैभव काकडे, प्रशांत टाकरखेडे, विरेंद्र जाधव, मधूकर भगत, सारिका दापूरकर तसेच विविध गावांतील नागरिक उपस्थित होते.अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडादुष्काळी परिस्थितीमुळे भूजलस्तर खालावला आहे. परिणामी नागरिकांना तसेच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला एकदा तरी पाणी सोडावे, जेणेकरून या भागातील पाण्याची खालावलेली पातळी वाढण्यास मदत होईल, पशुधनालाही पिण्याचे पाणी मिळेल, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला. यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सकात्मक असल्याचे दर्शविले.चारा छावण्या सुरू का नाहीत?दुष्काळी परिस्थितीचा सामना सर्व घटकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, जिल्ह्यात अजूनपर्यंत चारा छावणीचे नियोजन नाही. प्रशासनाने वैरण बियाणे वाटप केले असले तरी पाणी नसल्याने पिकेल कसे, असा प्रश्न जिल्हाधिकाºयांसमोर आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले.
यशोमती बरसल्या जिल्हाधिकाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:27 AM
तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात.
ठळक मुद्देपाणीटंचाईचा मुद्दा तापला : परिणामास प्रशासन जबाबदार